वडनगरी येथे दोघा भावंडांना बेदम मारहाण

वडनगरी येथे दोघा भावंडांना बेदम मारहाण

तीन जणांविरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव - jalgaon

तालुक्यातील वडनगरी येथे जुन्या वादातून दोन जणांना लोखंडी पट्ट्यासह काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. घटनेत दोन जण जखमी असून याप्रकरणी मारहाण करणार्‍या तिघांविरुध्द तालुका (police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडनगरी येथे शशिकांत प्रल्हाद सोनवणे वय ४५ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेतीकाम करून ते उदरनिर्वाह भागवतात. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शशिकांत सोनवणे हे घरासमोर उभे असताना याठिकाणी गावातीलच दिनेश विठ्ठल सोनवणे याच्यासह तीन जण आले. मागील भांडणाच्या कारणावरून तिघांनी शशिकांत सोनवणे यांना तू जास्त मातला आहेस, याला मारून टाका असे म्हणत शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आज आणीत एकाने शशिकांत सोनवणे यांच्या डोक्यावर लोखंडी पट्टी मारून दुखापत केली.

भांडण सोडवण्यासाठी शशिकांत सोनवणे यांचा भाऊ कैलास सोनवणे आला असता त्यालासुद्धा काठीने मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीत शशिकांत सोनवणे व त्यांचा भाऊ कैलास सोनवणे हे दोघे जखमी आहेत. शशिकांत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनेश विठ्ठल सोनवणे, सुदर्शन विठ्ठल सोनवणे, पंकज बाळकृष्ण सोनवणे तिघे रा.वडनगरी या तीन जणांविरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुशिल पाटील करीत आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com