आमदार गिरीश महाजन विरोधात गुन्हा दाखल

मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन : जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
आमदार गिरीश महाजन विरोधात गुन्हा दाखल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा (Front)काढून जमावबंदी (Crowd ban) आदेशाचे उल्लंघन (Violation of order) केल्याप्रकरणी सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भाजपचे () BJP आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्यासह दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (District Peth Police Station) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आमदार गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण सात ते आठ हजार लोकांचा जमाव जमला होता.

दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून मोर्चाचे आयोजन करणार्या भाजपचे आमदार गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी , खासदार उन्मेष पाटील ,खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुलाल पटेल, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदीलकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com