पैसे न दिल्याच्या कारणावरुन विक्रेत्याचा हात मोडला

लोखंडी दांड्याने मारहाण, शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल
पैसे न दिल्याच्या कारणावरुन विक्रेत्याचा हात मोडला

जळगाव - jalgaon

काही एक कारण नसतांना पैशांची मागणी करुन पैसे देण्यास नकार दिला जळगाव शहरातील घाणेकर चौकात शेख जावेद शेख ईस्माईल वय ४४ रा. मन्यारवाडा, जळगाव या भाजीपाला विक्रेत्याला एकाने लोखंडी दांड्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत विके्रत्याचा हात मोडला असून याप्रकरणी शनिपेठ (police) पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मन्यारवाडा परिसरातील कोळीपेठ येथे शेख जावेद शेख ईस्माईल हे वास्तव्यास आहेत. ते कांदे बटाटे विक्रीकरुन उदरनिर्वाह भागवितात. शेख जावेद हे मंंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे घाणेकर चौकात चौबे शाळेसमोर कांदे बटाटे विक्री करत होते. यादरम्यान साायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दस्तगीर शेख शेरु मिस्तरी रा. ईस्लामपुरा जळगाव हा शेख जावेद यांच्या दुकानावर आला. त्याने शेख जावेद यांना कुठलेही कारण नसतांना पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता, दस्तगीर शेख याने शेख जावेद यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याठिकाणी असलेल्या छत्रीच्या लोखंडी दांड्याने हातावर मारहाण केली. या मारहाणीत शेख जावेद यांच्या हाताचे हाड मोडले आहे. याप्रकरणी शेख जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दस्तगीर शेख शेरु मिस्तरी याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र बोदवडे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com