धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका विरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल
सायबर क्राइम

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका विरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल

यू ट्यूबवर वर्षभरापासून केले अनिमेटेड व्हिडीओ अपलोड

जळगाव - jalgaon

वर्षभरापासून वेळोवेळी (YouTube) यू ट्यूबच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावुन समाजात चुकीचा समज पसरविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव (Cyber ​​Police) सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तिने यूट्यूब या सोशल मीडिया साईटवर सेक्युलर डाग नावाचे युट्यूब चॅनेल सुरू केले. या चॅनलवर संबंधित अज्ञात व्यक्तिने आक्षेपार्ह व चुकीचे दिशाभूल करणारे संदेश देणारे ऍनिमेटेड व्हिडिओ अपलोड केले. अशाप्रकारे एक ते दीड वर्षापासून अज्ञात व्यक्ती एका विशिष्ट धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावुन त्या धर्माबद्दल समाजात चुकीचा गैरसमज पसरवत आहे. अशा आशयाच्या एका ६८ वर्षीय वृध्दाने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com