बहिणीच्या आत्महत्येमुळेच फकीराचा काढला काटा

जामडीतील खून प्रकरणी चौघांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
बहिणीच्या आत्महत्येमुळेच फकीराचा काढला काटा

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील जामडी येथील खून झालेल्या फकीर तरबेज शहा याकुब शहा याच्यामुळेच आपल्या बहिणीने आत्महत्या (suicide) केल्याचा राग मनात धरून इद्रीस शेख भिकन शेख याने तरबेज याच्या पाठीवर चाकू मारून खून केल्याचे चाळीसगाव ग्रामीण पोलीस (police) स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून दोघांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रकांडून मिळालेल्या माहीती नूसार, संशयीत इद्रीस शेख भिकन याच्या बहिणीने तरबेजच्या शहा याच्या त्रासाला कंटाळून २०१९ मध्ये आत्महत्या केली केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता व तरबेज हा एक महिना जळगाव सबजेलमध्ये होता. सध्या तो जामीनावर सुटलेला होता. तेव्हापासून भिकन अजीज शेख व त्यांच्या मुलाच्या मनात तरबेजबाबत राग होता. दोन महिन्यापूर्वीही भिकन शेख याच्या कुटुंबाकडून तरबेज याला आम्ही मारून टाकू अशी धमकी दिली होती.

दि.८ रोजी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास हा जामडी गावातीलच गयबन शहा बाबा दर्गा या ठिकाणी फातिया ( धार्मीक विधी ) करण्यासाठी गेला होता. तेथे तरबेज याला इद्रीस शेख भिकन शेख याने चाकू मारल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेत तरबेजला खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. बहिणीने केलेल्या आत्हत्येच्या संशयातून रागातून तरबेज याचा इद्रीस शेख याने पाठीवर चाकूने वार करून खून केल्याची फिर्याद मयत तरबेजचा भाऊ अजमल शहा याकुब शहा याने दिल्यावरून भिकन अजीज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख, इद्रीस शेख सर्व रा. जामडी यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com