सहा लाखाची लाच मागणाऱ्या नेरी येथील सहायक अभियंत्यावर गुन्हा दाखल

Anti Corruption Bureau
Anti Corruption Bureau

जामनेर Jamner : प्रतिनिधी

लघू उद्योगासाठी (small scale industry) योजनेतून डीपी मंजूर (DP approved) करून देण्यासाठी सहा लाखांची (Six lakhs) लाच मागणार्‍या (Asking for bribes) नेरीतील सहाय्यक अभियंत्यांवर (Assistant Engineers in Neri) औरंगाबाद (Aurangabad) एसीबीने (ACB) शुक्रवारी सकाळी 11 वाजता सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार अभियंत्याच्या शिवाजी नगरातील घरीदेखील पोहोचले मात्र संशयीत आरोपी (Suspected accused) असलेल्या हेमंत शालिग्राम पाटील याला संशय आल्याने त्याने चारचाकीतून पोबारा केला (Pobara did) तर एसीबीचे पथक आरोपीला पकडण्यासाठी पुढे आल्यानंतर पथकाच्या अंगावरही आरोपीने चारचाकी घातली. ही सिनेस्टाईल घटना जामनेर शहरात शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सहा लाखांची लाच मागणी अंगलट

एका तक्रारदाराला लघू उद्योगासाठी वीज डीपी हवी असल्याने त्यासाठी 14 लाखांचे कोटेशन लागेल मात्र मी तुम्हाला फुकटात डीपी मिळवून देतो मात्र त्यासाठी सहा लाखांची लाच लागेल, असे संशयीत आरोपी हेमंत शालिग्राम पाटील याने सांगितले. तक्रारदाराने जळगाव, नाशिकऐवजी थेट औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. सुमारे दोन महिन्यांपासून पथक आरोपीच्या मागावर होते मात्र यापूर्वीएकदादेखील आरोपीने लाचेबाबत संशय आल्याने ती स्वीकारली नव्हती.

एसीबी पथकाच्या अंगावर घातली गाडी

गुरुवारी सकाळी 11 वाजता पथकाने ट्रॅप लावला, तक्रारदार संशयीत आरोपीच्या घरी लाचेची सहा लाखांची रक्कम घेवून पोहोचला. यावेळी संशयीत आरोपी कामाचे निमित्त करून बाहेर त्यावेळी घराबाहेर असलेली गर्दी पाहून संशय बळावल्याने त्याने थेट चारचाकी काढली त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी एसीबीने त्याच्यावर झडप घातली असता आरोपीने पथकाच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com