
भडगाव Bhadgaon
तालुक्यातील शिंदी (Shindi) येथील नाना उखा मराठे या ५८ वर्षीय वृद्धास (old man) जमिनीच्या मालकी हक्काच्या (Ownership of land) कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी (Death threats) देत असल्याच्या कारणावरून आत्महत्येस प्रवृत्त (Suicidal)केल्या प्रकरणी १५ जणांवर (15 people) भडगांव पोलिस स्टेशनला (Bhadgaon Police Station) गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कारणावरून नाना उखा मराठे यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिंदी शिवारातील गट नं ३६३ मधील शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीला सुती दोरी बांधुन गळफास घेतला होता. याबाबत भडगांव पोलिस स्टेशनला सीआरपीसी १७४ प्रमाणे अकसमात मुत्युची नोंद दाखल करण्यात आली होती.
चौकशी वरून यातील आरोपी यांनी जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ दमदाटी करीत असल्याने व जिवे मारण्याची धमकी देत असल्याने फिर्यादीचे वडील यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
मयताचा मुलगा फिर्यादी भागवत नाना मराठे (वय -३६ रा.शिंदी. ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रमेश उखा मराठे, आशाबाई रमेश मराठे,रविद्र रमेश मराठे,बारकु रमेश मराठे,रा.शिंदी ता.भडगांव,राजेंद्र त्र्यंबक चव्हाण,इंदुबाई राजेंद्र चव्हाण, तुषार राजेंद्र चव्हाण,रा.पथराड ता.भडगांव,रावण दोधा काळे, उषाबाई राजेंद्र काळे,चंद्रकात रावण काळे,योगेश रावण काळे,रा.शिरुड जि.धुळे,चिंतामन मोरे,बेबाबाई चिंतामन मोरे,भुरा चिंतामन मोरे,मनिषा भुरा मोरे रा. पारोळा ता. पारोळा अशा १५ जणांवर दि. ४ रोजी भडगांव पो.स्टे ला भादवी कलम ३०६,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत.