महामार्गावर दुचाकीस्वाराला ट्रॅक्टरने चिरडले !

एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
महामार्गावर दुचाकीस्वाराला ट्रॅक्टरने चिरडले !

जळगाव jalgaon ।

शहरातून जाणार्‍या महामार्ग क्रमांक 6 वरील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोर भरधाव वेगाने जाणार्‍या आयशरने दुचाकीला धडक दिली. या घटनेत रस्त्यावर दोघी दुचाकीस्वार (bike rider) पडल्याने समोरून येणार्‍या ट्रॅक्टरच्या (tractor) पुढच्या चाकाखाली येवून एका तरुणाचा (youth) जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता घडली आहे. त्याच्यासोबत दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

प्रशांत भागवत तायडे (वय-30) रा. गहू खेडा ता. रावेर जि. जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय-23) रा. गहू खेडा ता. रावेर हा गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघेे मित्र आहे. दोघे जण धरणगाव तालुक्यतील चिंचपुरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील डिप्लोमाच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत होते. शुक्रवारी परीक्षेसाठी सकाळी गहुखेडा येथून चिंचपुर्‍याकडे दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीपी 2355) येण्यासाठी निघाले. परंतू दुपारी 1 वाजेच्या सुमारास खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोर येताच महामार्गावरून भरधाव आयशर क्रमांक (एमएच 19 सीवाय 8167)ने दुचाकीला मागून धडक दिली आणि दोघेजण रस्त्यावर पडले. त्याच क्षणाला समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच 19 एएन 2438) हे आले आणि प्रशांत तायडे यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. मागे बसलेला त्याचा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले

घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला जयेश पाटील याला तातडीने खाजगी रुग्णालयात नागरिकांनी तसेच पोलिसांनी नेले. अपघात घडल्याने महामार्गावर काही काळासाठी वाहतुक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा दोघी बाजूला लागल्या होत्या.

तायडे कुटूंबावर दुःखाचा डोंगर

अपघातामधील मृत प्रशांत तायडे याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यावर रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई साधना, वडील भागवत नागेश्वर तायडे आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com