केटीवेअरवरून पडल्याने मजूराचा मृत्यू

केटीवेअरवरून पडल्याने मजूराचा मृत्यू

पाचोरा - प्रतिनिधी pachora

तालुक्यातील वडगाव टेक येथील एका ४५ वर्षीय मजुराचा मोटरसायकल घसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवाशी प्रविण वामन पाटील हे ८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास मोटरसायकलने वडगाव टेक येथील केटीवेअर वरुन जात होते.

येथे प्रविण पाटील हे केटीवेअर वरुन खाली पडल्याने त्यांचे डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थ व रुग्णवाहिका चालक निळु पाटील यांच्या मदतीने प्रविण पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रविण पाटील यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. मयत प्रविण पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक भाऊ असा परिवार असुन व हात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविणारे प्रविण पाटील यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने वडगाव टेक सह परिसरात शोककळा पसरली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com