पाचोरा शहरात २५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा शहरात २५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा - प्रतिनिधी pachora

शहराच्या मोंढाळे रोडवरील २५ वर्षीय विवाहितेने दि. १० मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार शहराच्या मोंढाळे रोडवरील मयत विवाहितेचे पती देविदास पाटील हे हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दि.१० मार्च रोजी सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी दिपाली देविदास पाटील ह्या राहत्या घरी तीन वर्षाचा अल्पेश व १२ महिन्याच्या मुली सोबत होत्या. मुलगा अल्पेश हा घरा बाहेर खेळत होता, खेळून झाल्या नंतर तो घरी गेला असता अल्पेश यास आई छताला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याला दिसून आली.

त्या निरागस बालकाने आरडाओरडा करत इशारे करून शेजाऱ्यांना आईने फाशी घेतल्याचे व आई.. आई.. करत आक्रोश केला. शेजाऱ्यांनी घरात जावुन बघितले असता दिपाली ही छताला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक बापु हटकर हे घटनास्थळी धावून आले. त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती कळविली.

पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिका चालक यांच्या मदतीने मयत दिपाली हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहे. दोन चिमुकल्यांच्या पालनपोषण चा विचार न करता या मातेने आत्महत्या कोणत्या कारणास्तव का केली हे समझु शकले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com