शिरसोदे येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राकेश भास्कर बोरसे
राकेश भास्कर बोरसे

पारोळा । Parola । प्रतिनिधी

तालुक्यातील शिरसोदे (Shirsode) येथील राकेश भास्कर बोरसे पाटील (वय २१) याने आज दि. १७ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याचे राहते घरी घराच्या लाकडी सऱ्यास नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली.

तो अविवाहित (unmarried) असून त्यांच्या पश्चात एक भाऊ, आई असा परिवार आहे. त्याचे वडील सात वर्षापूर्वी मरण पावले आहेत. तर त्याचा लहान भाऊ सुरत (Surat) येथे कंपनीत आहे. याबाबत पारोळा (Parola) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com