बैल धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

खर्ची येथील घटना
 सागर माळी
सागर माळी

जळगाव । Jalgaon प्रतिनिधी

सर्वत्र पोळा हा सण उत्साहात साजरा होत असतांना एरंडोल Erandol तालुक्यातील खर्ची येथे धरणात बैलाला oxen धुण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय बालकाचा मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला आहे. सागर ज्ञानेश्वर माळी Sagar Dnyaneshwar Mali वय 15 रा. खर्ची ता. एरंडोल असे मयत मुलाचे नाव असून घटनेने पोळा सणावर विरजण पडले आहे.

पोळा सण असल्याने सर्वत्र ग्रामस्थ खर्ची गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणात बैल oxen धुण्यासाठी जात असतात. सोमवारी पोळा असल्याने सर्व ग्रामस्थ बैल oxen धुण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हा सुध्दा एकदाच घरचे बैल धुण्यासाठी गेला. बैल धुणे झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला.

याठिकाणी चिखलात पाय फसल्याने तो बुडाला. प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणच्या इतर ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात Jalgaon District Hospital हलविले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच खोटेनगरजवळ वाटेतच सागरचा मृत्यू झाला.

सागरच्या पश्चात वडील ज्ञानेश्वर दोधू माळी, आई गंगाबाई, बहिण भावना, भाऊ निर्मल असा परिवार आहे. सागर हा मोठा होता. तसेच तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रुग्णालयात सागरच्या वडीलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान घटनेने खर्ची गावात हळहळ व्यक्त होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com