
पाचोरा Pachora प्रतिनीधी
पाचोरा—भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या (Pachora—Bhadgaon Agricultural Produce Market Committee's) पंचवार्षिक निवडणुकीत (Elections) आमदार किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल , माजी आमदार दिलीप वाघ, नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसजिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उबाठा सेनेच्या वैशालिताई सुर्यवंशी यांचे महाविकास आघाडी पॅनल आणि भाजपा पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनल यांच्यात तिरंगी लढतीत विक्रमी मतदान झाले. बाजार समीतीच्या १८ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत पाचोरा -भडगाव तालुक्यातील ३३४३ शेतकरी मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकुण ९८.२२% मतदान (polling) झाले.
पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांची गो.से. हायस्कुल येथे एकाच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया सुरू असतांना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पोलीस प्रशासना तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नामदेव सुर्यवंशी तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सचिव बी.बी.बोरूडे यांनी कामकाज पाहीले.
सोसायटी मतदार संघ ११ जागांसाठी ३६ उमेदवार होते. त्यात दोन्ही तालूके मिळुन १५३४ मतदान पैकी १५०५ मतदान झाले. ग्रामपंचायत मतदार संघांच्या ४ जागांसाठी १२ उमेदवार होते.त्यात १२६८ मतदानापैकी १२४४ मतदान झाले.व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ०८ उमेदवार रिंगणात होते.यात २७३ मतदारांपैकी २६४ यांनी मतदान केले.तर हमाल मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी ०३ उमेदवार होते.यात २७२ मतदानापैकी २६५ मतदान झाले.
मतमोजणी दि.३० रविवार रोजी जारगाव शिवारातील रामदेव लॉन्स येथे होणार आहे.