अमळनेर : बाजार समिती निवडणुकीत सरासरी ९८.०७ % मतदान

अमळनेर : बाजार समिती निवडणुकीत सरासरी ९८.०७ % मतदान

अमळनेर : Amalner

अमळनेर बाजार समिती (Amalner Bazar Samiti) निवडणुकीत (elections) सरासरी ९८.०७ % मतदान (voting) झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत निम्मे मतदान झाले मात्र नंतर मतदारांनी एकच गर्दी केली होती.

 सेवा सोसायटी मतदार संघात ११२९ पैकी १११७ म्हणजे ९८.९३% मतदान झाले. ग्रामपंचायत मतदार संघात १०१५ पैकी ९८३  म्हणजे ९७ टक्के मतदान झाले. हमाल मापाडी मतदार संघात ३४४ पैकी ३४० म्हणजे ९८.८३ टक्के मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर आर पाटील , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिजरी व्ही एम जगताप ,सहाय्यक  निबंधक के पी पाटील ,सुनील महाजन , सुनील पाटील ,वासुदेव पाटील यांनी सहकार्य केले. 

    ३० रोजी व्यापारी लायब्ररी येथे सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होणार आहे. सुमारे ३० कर्मचारी मतमोजणीला नियुक्त केले आहेत.

   पोलीस निरीक्षक विजय शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी , पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

   दुपारून मतदानाला जाणार्ऱ्यांनीगर्दी केल्याने स्वामी समर्थ मंदिराजवळ प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. तर एकाच ठिकाणी मतदान झाल्याने सर्वच उमेदवार रांगेत मतदान मागत असल्याने मतदारांचा गोंधळ होत होता. उमेदवारांच्या गर्दीतून मतदाराला वाट काढणे मुश्किल होत होते. आमदार अनिल पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार शिरीष चौधरी शेवट पर्यंत ठाण मांडून होते. वृद्ध, दिव्यांग मतदारांना उचलून तसेच व्हील चेअरवर आणले गेले. काही दिव्यांग मतदार मात्र स्वतःच्या  कुबड्याचा आधार घेत मतदानाला पोहचले होते.

१६ जागांसाठी ५३ उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून मतदारांची सोसायटी मतदारसंघातून खूपच चांदी झालेली आहे एका मतदारा दोघी पँनल व अपक्ष मिळून चाळीस हजार रूपयाचे लक्ष्मी दर्शन झालेले आहे अशी खमंग चर्चा तालुक्यात दिवसभर सुरू होती  बहुमत आमचेच असेल असा दावा दोन्ही पॅनलकडून केला जात असला तरी दोन किंवा तीन उमेदवारव्यतिरिक्त कोण जिंकेल हे ठाम पणे कोणीही सांगू शकले नाही.

मात्र ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकामधून अपक्ष उमेदवार अनिल शिवदास शिसोदे मुसंडी मारतील असा अंदाज वर्तविला जात आहे 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com