मोरफळ येथील शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे 96 हजार चोरीला

मोरफळ येथील शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे 96 हजार चोरीला

पारोळा Parola

तालुक्यातील मोरफळ (Morphal) येथील शेतकऱ्यांचे (farmers) कापूस विक्रीतून (sale of cotton) आलेले पैसे (Money) घरातील एका कोठीमध्ये ठेवले असता अज्ञात चोरट्यांनी (thieves) त्यावर डल्ला मारत ९६ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास (Amount Lampas) केल्याची घटना दिनांक सहा रोजी उघडकीस आली

मोरफळ ता पारोळा येथील शेतकरी सिताराम आसाराम पाटील यांनी दिनांक २६ डिसेंबर रोजी आपला कापूस विक्री केला त्यातून दोन लाख २२ हजार रुपये त्यांना मिळाले त्यातील एक लाख २६ हजार रुपये त्यांच्यावर असलेले कर्ज धारकांना त्यांनी ती परत केली उर्वरित ९६ हजार रुपये त्यांनी दिनांक २९ रोजी त्यांच्या घरातील मागच्या बाजूला असलेल्या तुटलेल्या भिंती मागून शेवटच्या रूममध्ये लोखंडी कोठीत पैसे ठेवले होते.

त्यानंतर दिनांक सहा जानेवारी रोजी त्यांना पैशांची अडचण भासल्याने ठेवलेल्या ठिकाणी पैसे पाहण्यास गेले असता त्या ठिकाणी पैसे आढळून आले नाही. याठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुपारच्या सुमारास आम्ही शेतात जात असताना आमचे बंद घरात अनधिकृत प्रवेश करत ही रक्कम चोरली असल्याचे समजले म्हणून याबाबत आज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वानखेडे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com