पीजे रेल्वे गेज विस्तारीकरणासाठी 955 कोटी मंजूर

खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
रेल्वे
रेल्वे

मुक्ताईनगर Muktainagar । वार्ताहर

जिल्ह्यातील ब्रिटीश कालीन (British period) महत्त्वपूर्ण पाचोरा-जामनेर नॅरो गेज रेल्वेचे (Pachora-Jamner Narrow Gauge) ब्रॉड गेज (Broad Gauge) मध्ये परिवर्तन व मलकापूर (बोदवड) पर्यंत 84.34 किमी विस्तारीकरण (expansion) साठी आज रेल्वे (Railways) मंत्रालयाने आज आदेश काढून रु.955.39 कोटींना मंजुरी (955 crore sanctioned) दिली आहे अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे (MP Rakshatai Khadse) यांनी दिली.

पाचोरा-जामनेर नॅरो गेज रेल्वेचे ब्रॉड गेज मध्ये परिवर्तन व मलकापूर (बोदवड) पर्यंत विस्तारीकरण साठी अर्थसंकल्प मध्ये निर्मला सीतारामन यांनी समावेश केला होता, तसेच पीएम गतीशक्ती योजनेच्या बृहत आराखड्याच्या संस्थात्मक चौकटी अंतर्गत स्थापन केलेल्या नेटवर्क नियोजन गटाने परिक्षणाअंती पाचोरा-जामनेर गेज परिवर्तन व विस्तारीकरण याची शिफारस केली होती.

आज त्याचे रेल्वे बोर्डाचे निर्देशक दीपक सिंग व वित्त विभागाचे सदस्य यांच्या सहीनिशी पत्र मध्य रेल्वे व्यवस्थापक यांना प्राप्त झाले आहे, अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या 2014 पासून प्रयत्नशील होत्या, तसेच वेळोवेळी त्यांनी रेल्वे मंत्री यांना भेटून व महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री मा. गिरीषजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी निरंतर पाठपुरावा केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com