सावद्यासह परिसरात ९५ गणेश मंडळ..!

सावद्यासह परिसरात ९५ गणेश मंडळ..!

सावदा Savada प्रतिनिधी

अवघ्या काही तासातच चिंतामणी ( गणेशा ) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) दि ३१ आगस्ट रोजी असून आगमन मोठया उत्साहवर्धक वातावरणात आगमन (Arrive in an exciting atmosphere) सभामंडपात होत असून यंदा सालाबादप्रमाणे सावदा पोलीस ठाणे अंतर्गत एकूण ९५ खाजगी सह सार्वजनिक गणेश मंडळाची (95 Ganesh Mandals) स्थापना (establishing) करण्यात आली आहेत .

सावदा पोलीस ठाणे अंतर्गत एकूण ३२ ग्रामीण खेड्याचा समावेश असून सावदा शहरात ३० मंडळे तर ग्रामीण भागात ६५ खाजगी सह सार्वजनिक एकूण ९५ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे .गत कालखंडात करोनाचे संक्रमण होते त्या करणास्थव मर्यादा होती मात्र करोना कालबाह्य झाल्याने यंदा शिंदे व फडणवीस सरकारने सर्वं सण उत्साहात साजरे करण्याचे आदेश दिल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे

गणेशाचे आगमन सवाद्यवाजंत्री ,जय घोष करीत सभामंडपात महाकाय चिंतामणी गणेशयासह लहान मोठ्या मूर्त्याची स्थापना करण्यात आली आहेत तसेच सार्वजनिक मंडळाने ज्यातीत ज्यास्त नागरिकांन साठी समाजप्रभोधन करता येईल असे देखावे साजरे करण्याचा प्रयत्न करीत आहे .कायद्याचे चौकटीत राहून उत्साह साजरे करण्यात येत आहे .कायदा व सुव्येवस्था अबाधित राहण्यासाठी स.पो .नि . देविदास इंगोले सह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक जवान चौख बंदोबस्त ठेवत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com