जिल्ह्यातील 12 कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी 94.99 टक्के मतदान

जिल्ह्यातील 12 कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी 94.99 टक्के मतदान

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सहा बाजार समितीचा आज निकाल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या 12 बाजार समित्यांंसाठी आज दि.28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. 12 बाजार समित्यांसाठी एकूण 94.99 टक्के मतदान झाले. दरम्यान, जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील एका मतदान केंद्राबाहेर बोगस मतदान झाल्याच्या कारणावरुन गोंधळ उडाला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे हमाल व मापारी मतदार संघाचेे अपक्ष उमेदवार देवेन सोनवणे यांनी तक्रार केली. तुमचे काही म्हणणे असेल तर याचिका दाखल करा,यावरुन दोघांमध्ये शाब्दीक खंडाजंगी उडाली. जळगाव वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.

जिल्ह्यातील 12 कृउबा समिती निवडणुकीसाठी आज दि. 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी 8.30 वाजेनंतरच मतदानास सुरुवात झाली. 12 बाजार समित्यांसाठी सकाळी दहा वोजपर्यंत सरासरी 20ते 22 टक्के मतदान झाले होते. दुपारी 12 वाजेपर्यंत 11 हजार 754 मतदारांनी हक्क बजावल्याने सरासरी 39.54 टक्के मतदान झाले होते. तसेच दुपारी 2 वाजेपर्यंत 29 हजार 369 मतदारांपैकी 21 हजार 556 मतदारांनी मतदान केल्याने सरासरी 73.4 टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेनंतर एकूण सरासरी 94.99 टक्के मतदान झाले. आज जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून निकालाविषयी उत्सुकता लागून आहे.

सहा बाजार समितीसाठी आज मतमोजणी

जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर यासह 12 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी दि.28 एप्रिल रोजी मतदान प्रकिया पार पडली असून एकूण सरासरी 94.99 टक्के मतदान झालेले आहे. दि.29 एप्रिल रोजी भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या सहा बाजार समित्यांंची मतमोजणी होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक निणर्य अधिकार्‍यांनी सागितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com