बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ९४.५५ % मतदान

 बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ९४.५५ % मतदान

बोदवड Bodwad प्रतिनिधी

जिल्ह्यात बहुचर्चित असलेली आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून लढवल्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती (Bodwad Agricultural Income Market Committee) निवडणुकीत (Election) एकूण ९४.५५%मतदान (voting) झाले आहे.

आज सकाळी आठ वाजे पासून मतदानास सुरवात झाली सुरवातीपासून मतदारांनी मतदानास गर्दी केली होती. मतदानासाठी बोदवड,मुक्ताईनगर, उचंदे, कुऱ्हा काकोडा, वरणगाव असे मतदान केंद्रे होती. व्यापारी व हमाल मतदारसंघासाठी एकच केंद्र बोदवड इथे होत.आज केंद्र निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे बोदवड विकास संस्था मतदारसंघ ४३४ पैकी ३७१,मुक्ताईनगर ११७ पैकी११३,कुऱ्हा काकोडा १२६ पैकी १२६,उचंदे १०१ पैकी १००,वरणगाव १८१ पैकी १७३ असे एकूण ९७९ पैकी ८८३ .ग्रामपंचायत मतदारसंघ बोदवड ३१२ पैकी ३०४,मुक्ताईनगर १७४ पैकी १७०,कुऱ्हा काकोडा २१८ पैकी २१६,उचंदे १४७ पैकी १४७,वरणगाव १८१ पैकी१७७,असे एकूण १०३४ पैकी १०१४.तर व्यापारी मतदारसंघ १९५ पैकी १८८, हमाल मापारी १०७ पैकी १०४. असे एकूण २३१५ पैकी २१८९ असे ९४.५५% मतदान झाले.

आज बोदवड येथे केंद्राबाहेर शेतकरी परिवर्तन च्या बुथवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तर शेतकरी विकासच्या बुथवर आमदार एकनाथ खडसे यांनी भेट दिली होती जिल्हाध्यक्ष एड रवींद्र पाटील,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

.दुपारी अडीचच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटून जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदान केंद्रावर असलेले उमेदवार व कार्यकर्ते यांची तारांबळ उडाली होती.दोनही पैनलचे बुथचे मंडप उडून गेले होते.बोदवड येथील मतदान प्रक्रिया शांततेने पार पडली.या वेळी पोलीस पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, स.पो.नि.अंकुश जाधव, यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com