यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत 93.63% मतदान

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती

यावल Yaval प्रतिनिधी

 यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Yaval Taluka Agricultural Produce Market Committee) संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत (Election) दिनांक 28 एप्रिल 23 शुक्रवार रोजी सकाळी आठ ते चार वाजेच्या दरम्यान झालेल्या मतदानाप्रसंगी तालुक्यात 93.63% मतदानाची नोंद (Voting record) करण्यात आली त्यात 2604 मतदारांमधून 2438 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .

यावल तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यावल साखळी आणि फैजपूर येथे मतदान केंद्र भरण्यात आली होती यावल येथे सहकारी संस्था मतदार संघातील 260 मतदारांमधून 256 मतदारांनी म्हणजेच 98.46% तर साखळी येथे 161 मतदारांमधून 160 मतदारांनी म्हणजे 99.38% तर फैजपूर येथे 183 मतदारातून 181 मतदारांनी म्हणजेच 98.91% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोसायटी मतदार संघात 604 मतदारांमधून 597 मतदारांनी म्हणजेच 98.84% मतदान या मतदारसंघात झालेग्रामपंचायत मतदार संघातून यावल केंद्रावर 274 मतदारांमधून 268 मतदारांनी म्हणजेच 97.81% तर साखळी केंद्रावर 202 मतदारांमधून 195 मतदारांनी म्हणजेच 96.53% तर फैजपुर केंद्रावर183 मतदारांमधून 178 मतदारांनी म्हणजेच 97.27% मतदान केले एकूण 659 मतदारांमधून 641 मतदारांनी म्हणजेच 97.27% मतदान झाले

हमाल मापारी मतदार संघात यावल केंद्रावर 1008 मतदार मधून ८८० मतदारांनी म्हणजेच 97.39% मतदान झाले तर व्यापारी मतदारसंघात 333 मतदारांमधून 320 मतदारांनी म्हणजेच 96.10% मतदान झाले

यावल केंद्रावर सकाळी निवडणूक केंद्रावर सोसायटी मतदारसंघातील उमेदवार तथा जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे आणि पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये सकाळी किरकोळ कारणावरून आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांच्या समोर शाब्दिक चकमक झाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी म्हणूनच या कारणावरूनच ही चकमक झाल्याची सांगण्यात आले

तालुक्यात या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना दोन्ही पॅनल कडून धनशक्तीच्या लाभ कमी अधिक प्रमाणात झाला चे गोड बोलले जात असून ज्यांच्याकडे अधिक लक्ष मी गेली त्याकडे मतदानाचा कौल गेल्याचे दिसत असून उद्या दिनांक 30 एप्रिल रविवार रोजी पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात मतमोजणी सुरू होणार असून नेमकं आता मतदारांनी कोणाकडे कौल दिलेला आहे हे मतपेटी मध्ये पॅक झालेले असून मतपेटी फुटल्यावरच आता कोणाचे दैव उजळते हे त्यावेळी समजेल.

मात्र काटे की टक्कर जरूर थी आमचे पॅनल येणार असे दावे प्रति दावे दोन्ही पॅनल करून करण्यात येत आहेतचौकट यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय दिसून कारभार दिसून आला निवडणूक अधिकारी व निवडणूक प्रक्रिया कामात पत्रकारांना कुठलाही विचारपूस करण्यात आल नाही व पत्रकारांना निवडणूक अधिकाऱ्याची ओळखपत्र न मिळाल्याने पोलिसांनी या ठिकाणी फिरण्यास मज्जाव केला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com