923 शाळांची घंटा आज वाजणार

923 शाळांची घंटा आज वाजणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शासन (government) निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील शहरी (Urban)भागातील आठवी ते बारावीच्या 285 आणि ग्रामीण (Rural) भागातील पाचवी ते बारावीच्या 638 अशा सर्व माध्यमाच्या 923 शाळा (School) दि.4 ऑक्टोबर रोजी सुरु (Started) होणार आहे. यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी (Reducing the incidence of corona)झाल्याने ग्रामीण भागात 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. मात्र,पहिली ते सातवीचे वर्ग बंद होते.आता शाळा सुरु होणार असल्याने किलबिलाट (Chirp) वाढणार आहे.

कोरोना महामारीची लाट ओसल्याने राज्यासह जिल्ह्याभरातील शाळा दि.4 ऑक्टोबर रोजी उघडणार असून त्यादृष्टीने शहरी भागासह ग्रामीण भागातूनही शाळास्तरावर स्वच्छतेसह इतर सुविधांची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. आता सोमवारी शाळा उघडणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, पालकांमध्ये अजूनही धाकधूक आहे. तसेच शिक्षकांना शंभरटक्के उपस्थिती बंधनकार केलेली आहे.

मात्र, विद्यार्थ्यांना शंभरटक्के उपस्थिती सक्तीची नसल्याने पहिल्यादिवशी उघडणार्‍या शाळांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून शाळेत प्रवेश देण्यावर भर राहणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचा बोलबाला सुरु आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण लहान मुलांमध्ये पुरेसे रुजत नसल्याने शैक्षणिक क्षेत्रासह पालकांपुढे अनेक आव्हाने उभे आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेने व्ही स्कूल शैक्षणिक अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरु केले होते.

त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल रिचार्ज,नेटडाटा, रेंजची समस्या असा दिवसेंदिवस पालकांपुढे आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहत होता आणि विद्यार्थ्यांना अतिमोबाइल वापरामुळे मानसिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने पालकवर्गही त्रस्त झाला होता.

सोमवारी शाळा उघडणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्यात मोठा खंड पडलेला आहे. त्यामुळे शिक्षकांचा चांगलाच कस लागेल.

Related Stories

No stories found.