
रावेर Raver|प्रतिनिधी-
सुकी नदीवरील गारबर्डी धरणावर (Garbardi Dam) पर्यटनासाठी (tourism) गेलेले ९ जण पुरात (9 people got stuck in flood) अडकले असून,त्यांना सुरक्षित बाहेर (safe out) काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील (Administration efforts) आहे.याबाबत आता स्थनिक नागरिक (Local citizens) व एनडीआरएफची टीम (NDRF team) देखील घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती प्रांत अधिकारी कैलास कडलग (District Officer Kailas Kadalag) यांनी देशदूत शी बोलतांना दिली.
रविवार दि.१७ रात्री पासून सततधार पाऊस सुरु आहे.यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहे.सुकी नदीवरील गारबर्डी धरण देखील भरले असल्याने,पर्यटक या ठिकाणी गर्दी करू लागले आहे.दुपारी चार वाजेच्या सुमारास धरणावरून केवळ २० सें.मी.पाण्याचा विसर्ग सुरु होता.
यावेळी मोठ्या प्रमाणात असलेल्या पर्यटकांनी नदी पात्रात जाऊन आलेल्या पुराचा आनंद लुटला,यात काही जण थेट मधोमध जाऊन पुराचा आनंद घेत होते. अचानक नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्कील झाले.त्या ठिकाणी असलेल्या एका खडकावर ९ जण जाऊन बसले आहे.ते मदतीबाबत नागरिकांना विनवण्या करत आहे. मात्र हि परिस्थिती उद्भवली त्यावेळी अंधार पडू लागल्याने,अडकलेल्या पर्यटकांचा आवाज नदीतील पुराच्या पाण्याने ऐकू येत नसल्याने,मदत करणे स्थानिक नागरिकांच्या अवाक्याबाहेर झाल्याने,मदतीबाबत प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेण्याचा निणर्य घेतला आहे.
या ठिकाणी प्रांतअधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे रवाना झाले आहे.तर रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.रक्षा खडसे यांना याबाबत भाजप नेते भरत महाजन यांनी या घटनेबाबत माहिती दिली असता,खा.रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
सर्व पर्यटक हे जळगाव येथील असल्याची माहिती मिळत आहे.त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक येत असल्याची माहिती प्रांतअधिकारी कैलास कडलग यांनी दिली.