शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली शेतकर्‍याला 9 लाखांचा गंडा

ऑनलाईन फसवणुक प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सायबर क्राइम
सायबर क्राइम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in share market) केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळविण्याचे आमिष (Lure of profit) दाखवून भूषण दत्तात्रय हाटे (रा.उदळी, ता.रावेर) या तरुण शेतकर्‍याला (farmer) 9 लाख 30 हजार रूपयांत ऑनलाइन (fraud online) गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील उदळी येथील भूषण हाटे या तरुण शेतकर्‍याला दि. 14 डिसेंबर 2022 रोजी मित्र शेजल वराडे याने ऑरियन एफएक्स रोबो कंपनीची माहिती दिली. या कंपनीत मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळतो, त्यामध्ये मी सुध्दा पैसे गुंतविले असून तू देखील पैशांची गुंतवणूक कर असे सांगितले होते. त्यानंतर त्याने संबंधित व्यक्तीचा नंबर दिला. त्याने भूषण याला कंपनीची माहिती देवून त्याच्या मॅनेजरचा मोबाईल क्रमांक दिला. मॅनेजरने सुध्दा कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे सांगून पैसे भरण्यास सांगून एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. भूषण यांनी अ‍ॅप डाऊनलोड करून वेळावेळी एकूण 9 लाख 30 हजार रूपये ऑनलाइन भरले.

24 हजार 915 डॉलर झाला नफा

एके दिवशी अ‍ॅपवर लॉगिन केल्यानंतर त्यांना 24,915 डॉलरचा नफा झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती रक्कम निघत नसल्याने त्यांनी पैसे गुंतवणूकीबद्दल माहिती देण्या-या मॅनेजरशी संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने दोन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल असे सांगितले.

मोबाईल बंद आल्याने झाली फसवणुकीची खात्री

दोन दिवस उलटूनही गुंतवणुकीवरील नफ्याची रक्कम बँक खात्यावर न आल्याने भूषण यांनी पुन्हा संपर्क साधला पण, संबंधित व्यक्तीचा फोन बंद येत होता. ज्या व्यक्तीने त्याच्या मॅनेजरचा नंबर दिला, त्यालाही त्यांनी संपर्क साधला.

मात्र, त्याचाही मोबाईल बंद आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री भूषण यांना झाल्यानंतर सोमवारी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com