गणवेशासाठी 9 कोटींचा निधी

जि. प.च्या शाळांतील 1 लाख 58 हजार विद्यार्थी लाभार्थी
गणवेशासाठी 9 कोटींचा निधी
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषद (Zilla Parishad) समग्र शिक्षा अभियाना (Samagra Shiksha Abhiyan) अंतर्गत असणार्‍या जि.प.शाळांमधील इयत्ता 1ली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश (uniforms) दिला जातो. मात्र, मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने निधी मंजूर असूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता आला नाही. यावर्षी कोरोनाची (Corona) लाट ओसरल्याने 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरु (School started) झाल्या आहेत. सन 2021- 22 यावर्षासाठी 9 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झालेला असून 1 लाख 58 विद्यार्थी-विद्यार्थिनी गणवेश मिळणार आहे.

दरवर्षी शासनाकडून जि.प.समग्र शिक्षा अभियानातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिला जातो. एका गणवेशासाठी 300 रुपये तर दोन गणवेशासाठी 600 रुपये याप्रमाणे जिल्ह्यातील 1 हजार 826 जि.प.शाळांमधील 1 लाख 58 विद्यार्थी-विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असून त्यांना या गणवेशाचा लाभ मिळणार आहे. त्यात जिल्ह्याभरातील सर्व मुली,एस.सी मुले, एसटी मुले आणि बीपीएलधारक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

मागीलवर्षी गणवेशाविना विद्यार्थी

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. त्यामुळे मागील वर्षी या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देता आलेला नाही. परिणामी या योजनेसाठी उशिर झालेला असल्याने शासनाकडून 4 कोटींना निधी मंजूर केलेला होता. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश देण्याचे नियोजन होते. मात्र,वर्ष उलटूनही शाळा उघडल्या नसल्याने हा निधी पडून होता.

गणवेश वाटपाचे अधिकार शाळा व्यवस्थापनाकडे

एका विद्यार्थ्यासाठी 300 रुपये असे दोन गणवेशासाठी 600 रुपये प्रमाणे अनुदान शासनाकडून मंजुरी करण्यात आलेली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिंना गणवेश वाटपाचे अधिकार शाळा व्यवस्थापनाकडे राहणार असून त्यांनीच प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचे माप देवून शिवून देण्याची जबाबदारी राहणार आहे.

सुरक्षेसाठी मास्कचा वापर आवश्यक

कोरोनाची लाट हळूहळू कमी झालेली असल्याने 7 जुलै रोजी इयत्ता 8 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-महाविद्यालये उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर तीन महिन्या झाल्यानंतर 4 ऑटोबर रोजी इयत्ता 5वी ते 12 वी ची शाळा उघडण्यात आली असून कोरोनाचे नियम पाडून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच बहुतांश शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले आहे. सध्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसले तरी विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर करणे हाच सुरक्षेसाठी महत्वाची उपाययोजना आहे.

निधी मंजूर मात्र अनुदानाची प्रतीक्षा

जिल्हा परिषदेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिंना प्रत्येकी दोन गणवेश मंजूर असून असे 1 लाख 58 विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यासाठी शासनाकडून 9कोटी 52 लाखांचा निधी मंजूर आहे. शासनाकडून निधी मिळताच संबंधित विभागांकडे निधी वर्ग करुन शाळा व्यवस्थापन समितीकडे जाईल. त्यानंतर शाळानिहाय विद्यार्थ्यांच्या गणवेशाची प्रक्रिया पार पडणार आहे.

Related Stories

No stories found.