ग्रा.पं.साठी जळगाव जिल्ह्यात 80 टक्के मतदान

ग्रा.पं.साठी जळगाव जिल्ह्यात 80 टक्के मतदान

जळगाव । Jalgaon

जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दि.18 डिसेंबर रोजी सकाळापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागातील बहुतांश गावातील मतदान केंद्रावर सकाळी 8ते 12 वाजेच्या दरम्यान मतदान केंदावर मतदारांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यात 122 ग्रामपंचायतींमध्ये 1 लाख 69 हजार 299 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी 80. 23 टक्के मतदान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाल्याने आज 122 ग्रामपंचायतीसाठी 421 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामीण भागातील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळी गर्दी तर दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान शुकशुकाट होता. दुपारी 2 वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आहे. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 69 हजार 299 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मतदान केंद्राभोवती उमेदवारांसह समर्थकांची गर्दी

रिंगणातील उमेदवार आपल्या गावातील नातेवाइकांसह इतरांची मते आपल्याला कशी मिळतील ग्रामीण भागातील बहुतांश मतदान केंद्राच्या बाहेर आलेल्या मतदारांना हात जोडून आपल्याकडे लक्ष राहू द्या, असे सांकेतिक शब्दप्रयोग करुन मतदारांना आठवण करुन देणार्‍या उमेदवारांसह समर्थकांची गर्दी जमली होती.

दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा

ग्रामीण भागात शेतीसह मोलमजुरी करणार्‍या कामगारांनी सकाळीच मतदान करुन आपल्या कामावर हजेरी लावली. तसेच उमेदवारांसह नातेवाईक आणि समर्थकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर गर्दी होती. तर दुपारच्या सुमारास केंद्रांवर शुकशुकाट होता. काही मतदारांचे मतदार मात्र, ग्रामीण भागात लक्ष्मीदर्शन घडल्यानंतर दुपारी 4 वाजेनंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

जळगाव तालुक्यात विदगाव केंद्रावर गर्दी

जळगाव तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी 30 मतदान केंदावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विदगावसह इतर मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एका ग्रामपंचायतीसाठी तीन-तीन मतदान केंद्रे व प्रत्येकी पाच-पाच मतदान कर्मचारी कार्यरत होते.

जळगाव 87.63

जामनेर 86.86

धरणगाव 83.84

एरंडोल 84.35

पारोळा 83.06

भुसावळ 76.55

मुक्ताईनगर 76.82

बोदवड 80.55

यावल 79.67

रावेर 77.58

अमळनेर 79.70

चोपडा 73.36

भडगाव 80.89

चाळीसगाव 79.04

एकूण मतदान 80.23

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com