ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठीं 79 टक्के मतदान

115 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; उद्या मतमोजणी
ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठीं 79 टक्के मतदान

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (Co-operative Credit Bureau of District Government Servants) अर्थात ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात असून दि.28 एप्रिल रोजी जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 4 वाजेदरम्यान मतदान (Voting) प्रक्रिया राबविण्यात आली. जळगाव शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रासह जिल्ह्यातील 15 केंद्रांवर 32 हजार 44 मतदानापैकी 25 हजार 390 मतदारांनी (voters) मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान (Voting) झाले आहे.

Voting Clipart
Voting Clipart

जळगाव शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रावर सकाळी 8 वाजेपासूनच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क (Right to vote) बजाविण्यास सुरुवात केली होती. काही केंद्रांवर दुपारी 2 वाजेनंतर गर्दी वाढली. दुपारी 3 वाजेच्या सुमारास मतदान केंद्राच्या बाहेर पैसे वाटपाच्या संशयावरुन (suspicion of money laundering) एका तरुणाला काहींनी हटकल्याने केंद्राच्या आवारात राडा झाला.या गोंधळाच्या वातावरणामुळे अर्धा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस (police) दाखल झाल्यानंतर त्या तरुणाला बाहेर काढले आणि मतदान केंदात मतदान प्रक्र्रिया पुन्हा सुरळीत झाली. मात्र, काही मतदार उन्हामुळे 3 वाजेनंतर आल्याने गेटमध्ये राहिलेल्या मतदारांनी उशिराने 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. तर या गोंधळामुळे काहींना मतदानाचा हक्क न बजावताच काढता पाय घेतला. दरम्यान, गुरुवारी 21 जागांसाठी 32 हजार 44 मतदानापैकी 25 हजार 390 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे 115 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

शनिवारी होणार मतमोजणी

ग.स.सोसायटीच्या निवडणुकीच्या 21 जागांसाठी लोकमान्य (संस्थापक प्रगती) गट, सहकार गट, लोकसहकार ,प्रगती शिक्षक सेना, स्वराज्य पॅनल यांच्यासह अपक्ष उमेदवार असे एकूण 115 उमेदवार रिंगणात आहे. त्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले असून दि. 30 रोजी साकलक्ष 8 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हॉलच्या सभागृहात मतमोजणी (Counting of votes) होणार आहे, अशी माहिती सहकार निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

तालुकानिहाय मतदान

जळगाव 5160, अमळनेर 2429, बोदवड 444, भडगाव 1159, भुसावळ 1112, चाळीसगाव 25235, चोपडा 2062, धरणगाव 1031, एरंडोल 1072, जामनेर 1705, मुक्ताईनगर 697, पाचोरा 1669, पारोळा 1508, रावेर 1575, यावल 1232 असे 32,044 मतदारांपैकी एकूण 25,390 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Related Stories

No stories found.