खरीपाच्या 79 टक्के पेरण्या पूर्ण

जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक 99 टक्के लागवड पूर्ण
खरीपाच्या 79 टक्के पेरण्या पूर्ण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने (rain) एकूण 79 टक्के खरीपाच्या पेरण्या (sowing of kharif) झाल्या आहेत. एकूण पेरणीच्या 4 लाख 93 हजार 628 हेक्टरवर (99 टक्के) कापसाचा पेरा (Sow cotton) झाला आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे (Department of Agriculture) देण्यात आली.

यंदा जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. जून महिन्यात एकदा जोरात पाउस झाला. नंतर पावसाने ओढ दिली. पहिल्या जोरदार पावसानंतर काही शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. मात्र नंतरच्या ओढीने दुबार पेरणीचे संकट उभे होते. जूलै महिन्यात मात्र चांगला पाउस पडत असल्याने शेतकर्‍यांनी पेरण्या उरकण्यावर भर दिला आहे.

खरीपाचे एकूण क्षेत्र यंदा 7 लाख 70 हजार 874 हेक्टर होते. त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 11 हजार 509 हेक्टवर (79 टक्के) पेरण्या झाल्या आहे. कपाशीचा विचार करता कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र 4 लाख 98 हजार 925 हेक्टर आहे. त्यापैकी 4 लाख 93 हजार 628 हेक्टरवर (99 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. त्यातील कोरडवाहू पेरण्या 2 लाख 74 हजार 584 हेक्टरवर तर बागायती पेरण्या 2 लाख 19 हजार 44 हेक्टरवर झाल्या आहेत.

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या

जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात- 72 टक्के, भुसावळ - 61, बोदवड- 92, यावल -67, रावेर - 71, मुक्ताईनगर -77, अमळनेर - 85, चोपडा - 72, एरंडोल - 88, धरणगाव - 78 पारोळा - 99 चाळीसगाव - 69 जामनेर - 94 पाचोरा - 72 भडगाव - 81 अशा एकूण 79 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com