राज्यभरातील पक्षीप्रेमींकडून 7891 चिमण्यांची नोंद

निसर्गमित्रच्या महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणनेस उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यभरातील पक्षीप्रेमींकडून 7891 चिमण्यांची नोंद

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

निसर्ग मित्र (nature friend) जळगावतर्फे 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त (World Chimney Day)18 ते 20 मार्च या तीन दिवसात महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणना (Online Chimney Calculation) घेण्यात आली. या गणनेत महाराष्टातील 31 व अन्य राज्यातील 2 अशा एकूण 33 जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण 7 हजार 891 चिमण्यांची नोंद केल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

चिमणी गणना यात सहभागी जिल्ह्यानुसार नागरिकांचा सहभाग पुढील प्रमाणे- जळगाव 70, पुणे 27, कोल्हापूर 25, सांगली 24, नगर 22, नाशिक 16, धुळे 12, ठाणे12, मुंबई 8,अमरावती 8,यवतमाळ 5,लातूर 4,सोलापूर 4, चंद्रपूर 4,पालघर 3, अकोला 3, सातारा 3, नागपूर 2, भंडारा 3, रत्नागिरी 2, वाशीम 2, रायगड 2, बुलढाणा 2 नंदुरबार 2, छ.संभाजीराजेनगर 2, जालना 1, गोंदिय 1, वर्धा 1, नांदेड 1, सिंधुदुर्ग 1, हिंगोली 1 तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि कर्नाटक येथील बंगळूरू मधून प्रत्येकी 1 याप्रमाणे सहभाग घेतला.

या गणनेत सर्वात जास्त चिमण्या पुढील सहा जिल्ह्यात नोंदवण्यात आल्या. त्यात जळगाव 1703, पुणे- 1347, नाशिक-1183, सांगली- 613,कोल्हापूर 575 आणि नगर 331 चिमण्या नोंदवण्यात आल्याचे गाडगीळ म्हणाले. ही गणना तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी सकाळी 6.30 ते 9.30 किंवा संध्या.4.30 ते 6.30या वेळेत किमान 15 मिनिट वेळ देऊन करायची होती.

हा उपक्रम घेण्यामागे आमचा उद्देश चिमण्यांची संख्या आपल्या भागात किती हे समजून घ्यावी, त्या का कमी होत आहेत याविषयी जागरूकता निर्माण व्हावी व चिमणीविषयी प्रेम व पर्यावरणाविषयी आस्था वाढावी हा होता, असे पक्षीप्रेमी राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. चिमणी गणनेत नागरिकांनी घेतलेल्या सहभागाबद्दल पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com