रा.स.शि.प्र.मंडळाच्या निवडणुकीसाठी ७८.४१ टक्के मतदान

वडिलांसाठी खा.उन्मेष पाटील मैदानात, उमेदवरांपेक्षा राजकिय कार्यकर्त्याची गर्दी, ५१ उमेदवारांचा फैसला मतपेटी बंद, उद्या मतमोजणी,वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर
रा.स.शि.प्र.मंडळाच्या निवडणुकीसाठी ७८.४१ टक्के मतदान

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची (National Board of Co-operative Education Broadcasters) निवडणुकीसाठी (election) रविवारी मतदान प्रकिया (Voting process) पार पडली. दुपारी ४ वाजेपर्यंत जवळपास ७८.४१ टक्के मतदान झाले. एकूण ३३४५ मतदारापैकी २६२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती मिळाली आहे.

शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालयात संस्थेच्या १९ जागांसाठी रविवारी (दि,८) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणुकीसाठी सुमारे ५१ उमेदवार रिंगणात आहेत. सुरुवातीला संकाळी १० वापर्यत मतदानाची टक्केवारी अवघी ११ टक्के होती. परंतू त्यानतंर मताची टक्केवारी वाढत गेली व दुपारी चार वाजेपर्यंत ती ७८ टक्क्यांवर जावून पोहचली. एकूण ३३४५ मतदात्यापैकी २६२३ मतदारांना मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती मिळाली आहे. मतदारांना विन्यावण्या करण्यासाठी य.ना.चव्हाण महाविद्यालयाच्या पंटागणात प्रचंड गर्दी दिसून आली. खासदार उन्मेष पाटील हे देखील वडिलांच्या मतासाठी दिवसभर य.ना.चव्हाण महाविद्यालयात पटंगणात तळठोकूण होते. तर जवळपास सर्व उमेदवार हे संपूर्ण परिवारासह मतासाठी मैदनात दिसून आले. चाळीसगाव विद्यालयाच्या निवडणुकीच्या चित्रावरुन ही निवडणुक केवळ शैक्षणिक क्षेत्रातील नव्हे, तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकिय दिसून आली. निवडणुकीला निमित्ताने अनेक चर्चा समोर आल्या असून काल रात्रीपासून मतदारांना घरपोच ३५ ते ५० हजारांचे जड वजनाचे पॉकिट देण्यात आल्याचे बोलले जावू लागले आहे. ‘ मत कोणालाही द्या, परंतू आमचे पैसे घ्या ’ असे अनेक मतदारांना सांगण्यात येत आले आणि बळजबरीने त्यांच्याकडेे पैसे पोहचवण्यात आल्याची देखील चर्चा आहे. राष्ट्रीय विद्यालयाचे ३३४५ मतदार असून त्यापैकी निम्याच्यावर हे जेष्ठांच्या यादीत गेल्यामुळे अनेकांना रिक्षातून, व्हिलचेअरवरुन मतदानासाठी आनण्यात आले होते. बरेच मतदार हे जेष्ठ असल्यामुळे य.ना.चव्हाण महाविद्यालयात जेष्ठांचा मेळावा असल्याचे दिसून येत होते. तर या निवडणुकीला राजकिय वळण लागल्यामुळे खासदार व आमदारांचे कार्यकर्ते प्रत्यक्षात मैदानात उतरलेले दिसून आले. व एक-एक मतांसाठी धावपळ करीत होते.

वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर-

राष्ट्रीय विद्यालयाच्या गेल्या वर्षाच्या पंचवार्षिक निवडणुकीत जवळपास ६८ टक्के मतदाना झाले होते. यावेळी तीन पॅनल मतदानात रिंगणात असल्यामुळे, मतांची टक्केवारी वाढली असून ती ७८.४१ टक्क्यांवर जावून पोहचली आहे. राजकिय हस्तक्षेप व एक-एक मतांसाठी ३५ ते ५० हजारांपर्यंतचे पाकीटामुळे मतांची टक्केवारी वाढली असून आता वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडते. यांचा फैसला आज होणार आहे. तर वाढीव मतदानामुळे मातब्बारांना पराभवाचा समाना करावा लागणार आहे. वाढीव मतांमुळे हिवाळ्यात देखील छत्री उघडणार की, ढंगाळ वातावरणात विमान भरारी घेणार याबाबत उत्सुक्ता लागली आहे.

मातब्बरांच्या भवितव्याचा फैसला

राष्ट्रीय विद्यालयाच्या निवडणुकीसाठा आज दि,९ रोजी मतमोजणी होणार आहे. रात्री उशिरापर्यंत सर्व निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे. ५१ उमदेवारांच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. त्यात सर्वसाधारण गटात प्रचंड चुरस असून या गटात मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. सर्व साधारण गटात संचालकांच्या १४ जागा असून तेथे ३७ उमेदवार रिंगणात आहेत. महिला राखीव मतदार संघात २ जागा असून त्यासाठी ६ महिला उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागास वर्गीय मतदार संघाच्या १ जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. अनुसुचीत जाती / जमाती गटात तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. येथे दोन चुलत भावांमध्ये लक्षवेधी लढत होत.

सर्वसाधारण मतदार संघ (१४ जागा)- उमेदवार पंडितराव प्रमोद पांडुरंग पाटील, भैय्यासाहेब बाजीराव पाटील, आनंदराव लोटन अर्जुनराव पवार, भगतसिंग नरसिंग पवार, भिमराव माधवराव पवार, पाटील, रोहीदास लाला पाटील, शेनफडू निंबा पाटील, हंसराज बदामराव पाटील, विकास पंडितराव पाटील, गोविंदराव रामराव पाटील, साहेबराव भिकनराव पाटील, सुधीर पुंडलीक पाटील, विकास पुंडलीक पाखले, शरद बाळकृष्ण वाणी, बारीकराव रामा बाघ, धर्मराज रामा वाघ, प्रदिप वसंतराव अहिरराव, डॉ. संजय गोपाळराव देशमुख, डॉ. नरेश रंगराव देशमुख, डॉ. विनायक यशवंत चव्हाण, अरूण भिमराव निकम, तात्यासाहेब पंढरीनाथ निकम, प्रशांत रामराव देशमुख, अविनाश फकिरराव देशमुख, सुरेश रामचंद्र स्वार, शशिकांत भास्करराव साळुंखे, रावसाहेब जयवंतराव साळुंखे, भास्कर काशिनाथराव चव्हाण, तेजमल लक्ष्मण चव्हाण, बाळासाहेब विश्वासराव चव्हाण, धनंजय यशवंतराव चव्हाण, दिलीप रामराव चौधरी, किसनराव यशवंत जोर्वेकर,

महिला राखीव मतदार संघ (२ जागा) उमेदवार - नयनाबाई उद्धवराव पाटील, पुष्पा सदाशिव भोसले, अलका भिमराव बोरसे, चित्रा प्रकाशराव देशमुख, अनुपमा अविनाश सुर्यवंशी, सुलोचना नेताजी सुर्यवंशी. इतर मागास प्रवर्ग मतदार संघ (१ जागा) उमेदवार-

भाऊसाहेब महारू पाटील, शेषराव रामराव पाटील, अप्पा महादु चौधरी. अनुसुचीत जाती / जमाती मतदार संघ (१ जागा) उमेदवार किशोर माधव सोनवणे, महेश दिनकर चव्हाण, विश्वासराव दगडू चव्हाण.

विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (१ जागा) उमेदवार संजय रतनसिंग पाटील, सोनुसिंग प्रतापसिंग राजपूत, आदी उमेदवारांचे फैसला मतपेटीत बंद झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com