जि.प.कर्मचार्‍यांना 76 कोटींचे वेतन अदा

ऑक्टोंबर महिन्यातील पगार अदा झाल्यानंतर कर्मचार्‍यांची दिवाळी
जि.प.कर्मचार्‍यांना 76 कोटींचे वेतन अदा
Jalgaon ZP

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) आरोग्य, बांधकाम, महिला व बालकल्याण, सिंचन, सामान्य प्रशासन, लेखा व वित्त आणि शिक्षण अशा विविध विभागातील (various departments) कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे (staff and officers) ऑक्टोंबर महिन्यातील वेतन (Salary) दिवाळीपुर्वी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांनी जि.प. अर्थ विभागाकडे वेतनाचे प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेतील 10 हजार 480 कर्मचार्‍यांचे व 9 हजार 866 पेन्शनधारकांचे वेतन 76 कोटी अदा करण्यात (To be paid) आले आहे.

दरम्यान, शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांचे 53 कोटी रुपये आज टाकण्यात आले असून, उद्यापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागातील एकूण 10 हजार 480 कर्मचारी असून, 9 हजार 866 पेन्शनधारक आहेत. दिवाळी सणानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचारी अधिकार्‍यांना ऑक्टोंबर महिन्याचे 76 कोटींचे वेतन तर पेन्शनधारकांना 29 कोटी रुपये दिवाळीत देण्यात आले.

जिल्हा परिषदेमधील सर्वाधिक शिक्षण विभागाची मोठी संख्या असल्याने 53 कोटी रुपयांचा धनादेश मंगळवारी अर्थविभागाकडून जिल्हा बँकेकडे रवाना झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची दिवाळी जोरात होणार आहे.

शासनाच्या दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागासह विविध विभागाकडून वेतनाचा अहवाल आल्यानंतर विभागनिहाय वेतन बँकेत जमा करण्यात आले आहे.

राजेंद्र खैरनार, प्रभारी मुख्य लेखाधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com