फिरत्या लोकअदातील ७२ प्रकरणे निकाली

फिरत्या लोकअदातील ७२ प्रकरणे निकाली

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
तालुक्यातील बोरखेडे येथे शुक्रवारी झालेल्या फिरते (Lok Adalat) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ७२ प्रकरणे निकाली काढण्यात येवून ५१ लाख ८२ हजार ५३८ रुपयांची वसुली झाली.

चाळीसगाव तालुका (Legal Services Committee) विधी सेवा समिती व (Bar Association) वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी वर्ग एक ए.एच. शेख यांच्या अध्यक्षतेत फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतच्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिबिरास व फिरते लोक अदालतीस सुरुवात झाली. सर्वप्रथम जि.प. मराठी मुलांची शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तालुका वकील संघाचे माजी सचिव ऍड.कविता जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच शिक्षिका संयोगिता शुक्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी जी.एस. पाटील, डी.के. पवार, एन.आर. पिंपळे, आर.एन. चव्हाण, डी.टी. कुर्‍हाडे, किशोर पाटील यांनी परिश्रम घेतले.

तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर चाळीसगाव एन.के. वाळके यांनी गटविकास अधिकारी, सर्व सहाय्यक अभियोक्ता, सर्व बँक अधिकारी, नगरपालिका अधिकारी, वीज महावितरण अधिकारी, सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि फिरते लोक अदालत यशस्वितेकरिता सहकार्य केले. सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. दाखल पूर्व ६० प्रकरणांपैकी ३७ निकाली : या फिरते लोक अदालतमध्ये दाखल पूर्व ६० इतके प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३७ इतके प्रकरणे निकाली काढण्यात येवून त्याबाबत ७ लाख ९८ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे चाळीसगाव न्यायालयातील एकूण दाखल असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे ६२ पैकी ३५ इतके निकाली काढण्यात आले. त्या बाबतची ४३ लाख ८४ हजार ५३८ रूपये वसुली करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com