फुले मार्केटमधून महिलेच्या पर्समधून 70 हजारांची रोकड लंपास

फुले मार्केटमधून महिलेच्या पर्समधून 70 हजारांची रोकड लंपास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गर्दीचा (crowded) फायदा घेत खरेदीसाठी आलेल्या विवाहितेच्या (Married) पर्समधून (purse) चोरट्यांनी (thieves) 70 हजारांची रोकड (Cash extended) लांबविल्याची घटना दि. 20 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फुले मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे शुभांगी सुरेश बडगुजर हे आपल्या कुटुंंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पती सुरेश बडगुजर हे शेती करतात तर शुभांगी बडगुजर या खासगी क्लासेस घेवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांची क्लासेस घेवून त्यातून मिळालेल्या पैशातून बचत करुन 70 हजार रुपये जमा केले होते. त्यांचे नातेवाईक प्रभाकर बडगुजर यांना अडचण असल्याने त्यांना 70 हजार रुपये उसनवारीने द्यायचे होते.

दि. 20 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शुभांगी बडगुजर या पतीसोत जळगाव येथे आल्या होत्या. त्यांनी जोडवे व साकळी जुने देवून नवीन करावयाचे असल्याने ते खरेदीसाठी दुकानात गेल्या. यावेळी त्यांनी जोडवे अणि साकळी नवीन केल्यानंतर ते सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य खरेदीसाठी फुले मार्केटमध्ये आले.

फुले मार्केटमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातचालाखी करीत शुभांगी बडगुजर यांनी पर्समध्ये ठेवलेले छोटे पाकीटातील 70 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. दुकानदाराला पैसे देेण्याठी विवाहितेने पर्स उघडली असता, त्यांना त्यात ठेवलेले पाकीट दिसून आले नाही. त्यांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com