चाळीसगाव एज्यु.सोसायटीसाठी ६५ टक्के मतदान

चाळीसगाव एज्यु.सोसायटीसाठी ६५ टक्के मतदान

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी-

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मंडळाच्या (Chalisgaon Education Society Board) १६ जागांसाठी (16 seats) रविवार(दि,१३) झालेल्या मतदानात (voting) एकूण ८५१० मतदारांपैकी (voters) ५४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला असून ६४.०७ टक्के मतदान झाले. आज सोमवार दि,१४ रोजी मतमोजणी (counting of votes)होवून निकाल (result) लागणार आहे. त्यामुळे १६ सदस्यांनी देव पाण्यात ठेवले असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. वाढीव मतदानाची टक्केवारी पाहता, याचा फायदा कोणाला होणार याविषयी शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तर ढिसाळ नियोजनामुळे (Due to poor planning) बरेच बोगस मतदान झाल्याची चर्चा असून बोगस मतदान (bogus voting) करतांना एकाला पकडून दिले आहे. तर एकाचा प्रयत्न हाणून पाडल्याची माहिती मिळाली आहे.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मंडळाच्या १६ जागांसाठी ३४ उमेदरवार रिंगणात उतरलेले आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने तीन पॅनल मैदानात उतरले होते. यापैकी दोन पॅनलमध्ये सुरस होती. रविवारी संकाळा पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. संकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १० ते १२ टक्के मतदान झाले होते. परंतू दुपारी १२ नतंर मतदानाचा टक्केवारी वाढली. आणि दुपारी ३ वाजपर्यंत ती जवळपास ४५ टक्क्यांवर गेली आहे. सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून ती ६५ पर्यंत पोहचली. एकूण ८५१० मतदारांपैकी ५४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. तर बरेच मयत मतदाराचे नाव मतदान यादीतून न वघळ्यामुळे मतदानाची आकडेवारी कमी झाली आहे.

मतमोजणी व निकालकडे सर्वांचे लक्ष-

शहरातील चाळीसगाव महाविद्यालयात आज ( दि,१४) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. संकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार असून लागलीच निकाल देण्यात येणार आहे. मतदान झाल्यानतंर सर्व मतपेट्या ह्या चाळीसगाव महाविद्यालयात ठेवण्यात आल्या असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय आधिकारी ऍड.रंजीत पाटील यांनी दिली आहे.

मतदारांमध्ये उत्साह-

गेल्या अनेक वर्षानतंर या निवडणुकीमध्ये दोन पॅनल पूर्णक्षमतेने उतरल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मतदार हे स्वयंपूर्तीने मतदानासाठी येत होते. तर काही मतदारांनी आपल्या जुन्या शाळेत मतदान केल्यानतंर मोबाईलमध्ये सेल्फी काढुन घेत मतदानांचा आनंद साजरा केला. आणि शाळेतील जुन्या आढवणीना देखील उजाळा दिला.

ढिसाळ नियोजनांमुळे बोगस मतदान ?-

मतदान प्रक्रियेसाठी ज्या पद्धतीने नियोजन केले पाहिजे, त्या पद्धतीनी नियोजन केल्याची दिसून आले नाही. मतदान परिसरात उमेदवारासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. तर मतदान केंद्रामध्ये सुध्दा प्रचाराची पतंग उंच उडतांना दिसून येत होती. मतदान केंद्राच्या अगदी जवळच उमेदवारांसह कार्यकर्त्यांना थांबवण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे बोगस मतदान झाल्याची चर्चा होती. तर एक बोगस मतदाराला परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यानी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती मिळाली आहे.

मतदानाच्या वाढीव टक्केवारीचा फायदा कोणाला

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मागील वर्षीच्या निवडणुकीत जवळपास ५८०० मतदान झाले होत. तर यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा आकडा वाढला असून तो ५४५३ वर जावून पोचहला असून तब्बल ६४०७ टक्के मतदान झाले. यंदा दोन पॅनलमध्ये चुरस निर्माण झाल्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली असून वाढीव मतदानाचा फायदा कोणाल होता, यचा फैसला आज होणार आहे. तर शिक्षण क्षेत्रातील जाणकर मंडळीच्या मतानूसार वाढीव मतांचा फायदा हा परिवर्तन पॅनला होणार असल्याचे बोलले जात आहे.

असा लागू शकतो निकाल

एज्युकेशन सोसायटीच्या १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आज धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात सत्ताधारी प्रगती पॅनला १० ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर परिवर्तन पॅनला पाच ते सहा जागा मिळु शकतात. तर सोसायटी बचाओ पॅनला सुध्दा एखादी जागा मिळण्याची चिन्ह आहेत.

मतदान प्रक्रियेत मतदरांचा उत्साह पाहता, व गेल्या पाच वर्षात नारायणभाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वात केलेल्या विकास कामांमुळे आमचा १६ जागावर विजय निश्‍चित आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत टक्केवारी ही समाधानकारक आहे.

योगेश अग्रवाल, प्रगती पॅनल

मतदानाची वाढीव आकडेवारी परिवर्तनाची लाट आहे. लोकांचा उत्साह हा आमच्या बाजून दिसून आला आहे. परिवर्तन पॅनलाचे ८ ते १० उमेदवार विजयी होणार असल्याचा आमचा विश्‍वास आहे. मतदारांनी जो उत्साहा दाखवला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

डॉ.विनोद कोतकर, परिवर्तन पॅनल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com