तुरीच्या शेतात 62 लाखाच्या गांजाची लागवड

एरंडोल पोलिसांची कारवाई, मुद्देमाल केला जप्त
खडके सिम येथील शेतातून जप्त केलेली गांजाची रोपे.
खडके सिम येथील शेतातून जप्त केलेली गांजाची रोपे.

एरंडोल  Erandole प्रतिनिधी

धारागीर बीट मधील खडके सिम (Khadke Sim Shivara) ता. एरंडोल शिवारात असलेल्या तुरीच्या पिकात (Turi crop) गांजाची लागवड (Cultivation of Cannabis) करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव (Police Inspector Dnyaneshwar Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड (foray) टाकून उघडकीस आणली. पोलिसांनी शेतातून 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा 875 किलो गांजा आणि एक मोटरसायकल सुमारे 61लाख 95 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला.

याबाबत माहिती अशी की खडके सिम शिवारातील येवला मनमाड राज्य मार्गालगत असलेल्या गट क्रमांक 12 मधील दिगंबर पंडितराव पाटील व गट क्रमांक 20/21 मधील नितीन दिगंबर पाटील दोन्ही राहणार खडके सिम तालुका एरंडोल यांच्या अकरा एकर शेतात असलेल्या तुरीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव ,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अनिल पाटील, विलास पाटील, राजेश पाटील, अखिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर पाटील, वाहक हेमंत धोंडगे, गृहरक्षक दलाचे दिनेश पाटील यांचे सह शासकीय पंच, नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडळ कृषी अधिकारी निखिल तोळकर, तलाठी सुधीर मोरे, कृषी सहाय्यक परमेश्वर बेडगे यांनी शेतामध्ये जाऊन छापा टाकला.

यामध्ये 11 एकर क्षेत्रात 875 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा व होंडा शाईन क्र एम पी 10 एम वाय 6294 क्रमांकाची मोटरसायकल जप्त केली.  सदरचे शेतमालक हे गुजरात मध्ये राहत असून  त्यांनी सदरचे शेत हे मेरसिंह खरटे गाठीया खरटे रा ढेढगा, खरगोन मध्य प्रदेश यास कसण्यासाठी दिल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली संशयित मेरसिंह खरटे यास पोलिसांची कुणकुण लागतात तो पसार झाला. शेतात गांज्याची लागवड केल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाली होती. मात्र अंधार पडल्यामुळे शेतात काही दिसत नसल्यामुळे रात्रभर शेतात पोलिसांचा बंदोबस्त ठेवून आज सकाळी पंचनामा करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरच्या शेताला चारही बाजूने तारेचे कुंपण करण्यात आलेले आहे. सदरच्या शेतात तीन ते चार वर्षांपासून  गांजासारख्या अमली पदार्थाची लागवड करण्यात येत असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमधील सुरू होती. याबाबत हवलदार विलास पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

खडके सिम येथील शेतातून जप्त केलेली गांजाची रोपे.
ना.अंबादास दानवे यांचा आरोप : शिंदे सरकार शेतकरी विरोधी

संपूर्ण शेतात मका व तुरची लागवड करण्यात आली आहे. दोन तुरीच्या झाडांच्या मधोमध गांजाच्या झाडाची लागवड करण्यात आली होती. या गांजाच्या झाडांना ठिबकने पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. थोड्याच दिवसांपूर्वी तुरच्या झाडांना खत पाणी न देता फक्त गांजाच्या झाडांनाच खत पाणी देण्यात आले होते असे दिसून आले.

सकाळी 11 वाजेपासून गांजाच्या झाडाला उपटण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह अनिल पाटील,अकिल मुजावर,पंकज पाटील,जुबेर खाटीक,मिलिंद कुमावत,संदिप पाटील, विलास पाटील,हेमंत धोंडगे या पोलीस कर्मचाऱ्यांसह नायब तहसिलदार दिलीप पाटील कासोदा विभागाचे कृषी मंडल अधिकारी निखिल टोळकर,कृषी सहाय्यक परमेश्वर बेडगे, तलाठी सुधीर मोरे हे दिवसभर शेतात ठाण मांडून होते.

खडके सिम येथील शेतातून जप्त केलेली गांजाची रोपे.
पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन

सुरवातीला 8 शेतमजूर यांनी सुरुवात केली नतंर 6 शेतमजूर वाढवून असे एकूण 14 शेतमजुरांनी गांजाची झाडे उपटून एका ठिकाणी गोळा करण्यात आले. 18 मोठ्या पोत्यामध्ये भरून एकूण 875 किलो गांजा बोलेरो पिकअप गाडीने एरंडोल पोलीस स्थानकात आणण्यात आले.

गाजांच्या काही झाडाची उंची एक ते दीड फूट तर काही झाडाची उंची चार ते पांच फूट फुले लागलेली होती.

ज्या शेतात गांजाची लागवड केली होती त्या शेतात गेल्या तीन वर्षांपासून तुरचीच पेरणी केली जात  होती व कदाचित या पूर्वी सुध्या गांजाची लागवड होत असेल अशी आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती

खडके सिम येथील शेतातून जप्त केलेली गांजाची रोपे.
Photos # संतनगरीत उसळली भक्तांची गर्दी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com