6 टन प्लास्टिक जप्त,55 हजारांचा दंड

6 टन प्लास्टिक जप्त,55 हजारांचा दंड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील फुले मार्केट, बळीराम पेठ, दाणा बाजार, सुभाष चौक आणि एमआयडीसी आदी ठिकाणी एकाच वेळी प्लास्टिक जप्तीची मोहीम (Plastic confiscation campaign) राबविण्यात आली आहे. यात 6 टन प्लास्टिक जमा करून व्यावसायिकांना (professionals) 55 हजारांच्या दंडाची कारवाई (Penalty action) महापालिकेच्या आयुक्तांसह (Municipal Commissioner) पाच जणांच्या पथकाने केली.

6 टन प्लास्टिक जप्त,55 हजारांचा दंड
...आणि म्हणून ग्रामिण भागात आजही तांब्या पितळाच्या भांड्याना होते कथील पॉलीश
jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation
6 टन प्लास्टिक जप्त,55 हजारांचा दंड
चक्क पोलीस उपअधीक्षक प्रधान यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होतो तेव्हा...

महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी अधिनियमाचे (Plastic Ban Act) उल्लंघन करणारे निर्माते, वितरक व किरकोळ विक्री करणारे विक्रेते यांच्यावर कायद्याची जबर बसण्यासाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे उपायुक्त अभिजीत बाविस्कर, महसूल उपायुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक यु.आर.इंगळे,फायर विभागाचे शशिकांत बारी आदींनी 5 पथके तयार करून अचानक कारवाई सुरू करण्यात आली.

त्यात एमआयडीसी, फुले मार्केट, बळीराम पेठ, दाणा बाजार, सुभाष चौक आदी ठिकाणी एकाच वेळी प्लास्टिक जप्तीची (Plastic confiscation campaign) कारवाई करण्यात आली आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात 5.30 ते 6 टन प्लास्टिक जमा करून एकूण रुपये 55 हजारांचा दंड करण्यात आला. यावेळी एमपीसीबीचे चव्हाण, मनिष महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवीचा (Cloth bag) वापर करावा. प्लॅस्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणारे निर्माते, वितरक व किरकोळ विक्री करणारे विक्रेते यांच्यावर मनपाची कारवाई निरंतर सुरू राहील,असा इशारा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला आहे.

6 टन प्लास्टिक जप्त,55 हजारांचा दंड
स्काऊट-गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी अनिता चौधरी

Related Stories

No stories found.