उकीरड्यावर मृतावस्थेत आढळले ६ महिन्यांचे बाळ

Crime
Crime

जळगाव : Jalgaon

शहरातील राजीव गांधी नगर येथे उकीरड्यावर ४ ते ६ महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळूल आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजीव गांधी नगर परिसरात भंगार गोळा करत असतांना मुलांना एका उकीरड्यावर अंदाजे ४ ते ६ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ आढळून आले. त्यानुसार प्रकार समोर येवून नागरिकांना घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक शांताराम पाटील, हरीश डोईफोडे, विजय जाधव, निलेश बच्छाव, सुशिल चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बाळाला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांना बाळाला मृत घोषीत केले. या घटनेबाबत अज्ञात मातेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com