570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जिल्ह्यासाठी 150 कोटींचा वाढीव निधीसाठी प्रयत्न - पालकमंत्री
570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजना (District Annual Plan Year) वर्ष 2023-24 यासाठी तब्बल 569 कोटी 80 लक्ष रूपयांची (569 crores 80 lakhs provision of Rs) तरतूद असणार्‍या प्रारूप आराखड्याला (draft plan) जिल्हा नियोजन मंडळाच्या (District Planning Board) सभेत आज मंजुरी (Granted approval) देण्यात आली. जिल्हा विकासासाठी (district development) अजून 75 ते 100 कोटी रूपयांची अतिरिक्त तरतूद (Additional provision) करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी दिली.

570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
खडसेंच्या मुलाचे काय झाले? हा संशोधनाचा विषय

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सन 2022-23 च्या पुर्नियोजन प्रस्तावास मंजुरी दिली असून या सभेत चालू वर्षातील 599.50 कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्ह्याचा विकास करतांना शेतकरी केंद्रबिंदू मानून तसेच सामान्य माणसांची बांधिलकी ठेऊन विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन प्रलंबित व नव्याने सुचाविलेली कामे मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन करून कामे दर्जेदार व विहीत मुदतीत पुर्ण करून प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपून घेणार नसल्याचा इशारा ना. गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
Photos # ...तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई

चालू वर्षातील खर्चाचा आढावा

वार्षिक योजना 2022-23 मध्ये सर्वसाधारण योजनेत 452 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 66 कोटी 20 लाख 54 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत निधी पैकी 57 कोटी 05 लाख 55 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. डउझ उपयोजनेत 91 कोटी 59 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 2 कोटी 91 लाख 19 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत निधी पैकी 02 कोटी 90 लाख 49 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. तर टिएसपी - ओटीएसपी योजनांसाठी 55 कोटी 91 लाख 71 रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 05 कोटी 64 लाख 78 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत निधी पैकी 32 लाख 15 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. एकूण एकंदर खर्च 599 कोटी 50 लाख 71 हजार पैकी 60 कोटी 28 लाख 19 हजार खर्च झाला आहे. शासनाकडून कामांना असलेल्या स्थगितीमुळे निधी अप्राप्त होता. त्यामुळे यावर्षाचा आजपावेतो 10.05 टक्के खर्च झालेला आहे.

570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
बी ग्रेड तुपाचे उत्पादनास दूध संघाला परवानगीच नाही!

100 टक्के निधी खर्च करण्याचे आदेश

या बैठकीत खासदार, आमदार व नियोजन समितीच्या सदस्यांनी या महिन्याच्या अखेरीस पर्यंत कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. सर्व यंत्रणांनी युध्द पातळीवर प्रयत्न करून निधीचा पूर्ण विनीयोग करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर आदी प्रक्रिया तात्काळ पार पाडण्याचेही त्यांनी सांगितले. 100 % निधी खर्च होण्याबाबत प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com