अवकाळीमुळे 562 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अवकाळीमुळे 562 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यात दि. 15 व 16 रोजी झालल्या वादळी वार्‍यासह (gale force winds) अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) 562 हेक्टर शेती पिकाचे (agricultural crops) नुकसान (damage) झाले आहे. यात हरभरा, गहू, मका आणि ज्वारी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागातर्फे (District Agriculture Department)जिल्हाधिकार्‍यांना (Collector) सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात दि. 18 मार्चपर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. 15व 16 रोजी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. या वादळी वार्‍यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा या सात तालुक्यांना मोठा फटका बसला आहे.

सात तालुक्यातल 46 गावांमधील 626 शेतकरी अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. तर, हरभरा 107 हेक्टर, गहू 110 हेक्टर, मका 172 हेक्टर, ज्वारी 143 हेक्टर आणि केळी 28.50 हेक्टर असे एकूण 562 हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

जिल्हा कृषी विभागातर्फे हा प्राथमिक स्वरुपाचा अहवाल तयार करण्यात आला असून, सद्यास्थितीला पंचनामे सुरु आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागातर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com