सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध

शाहू, फुले, आंबेडकर सेवाभावी संस्थेने केले होते आयोजन
सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध

रावेर|प्रतिनिधी raver

येथील फुले, शाहू, आंबेडकर सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित सामुहिक (wedding) विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.सामुहिक विवाह सोहळ्याचे यंदा १० वे वर्ष होते. येथील (Sardar G G High School) सरदार जी जी हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या या सोहळ्याला (MLA Shirish Chaudhary) आमदार शिरीष चौधरी, उदयोजक श्रीराम पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शैलेन्द्र जाधव, आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी,जनक्रांती मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे, संविधान आर्मीचे जगन सोनवणे, शेखर बडगे, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजुमदार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, पद्माकर महाजन, विनोद सोनवणे, बाळू शिरतुरे, समाधान साबळे, जगदिश घेटे, सुरेश नाईक, योगेश गजरे, पंकज वाघ, श्रावण मेढे, धूमा तायडे, सुरेश सोनवणे, राजू सुवर्णे, सुरेखा तायडे, विनोद शिरतुरे, रघुनाथ कोन्घे, अनिल घेटे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पूज्य भन्ते आचरानंद महाथेरो यांनी वधू-वरांना त्रिशरण पंचशील दिले. विवाह विधी केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांनी पार पाडला.या सोहळ्यासाठी शाहू फुले आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.