जिल्ह्यात 49 हजार दिव्यांगाची स्मार्टकार्डसाठी नोंदणी

21 हजार दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे प्रमाणपत्र घरपोच
jalgaon zp
jalgaon zp

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्तींसाठी (Persons with disabilities) केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Govt) विविध योजनांचा लाभ (Benefits of various schemes) घेण्यासाठी युडीआयडी नोंदणी आवश्यक आहे. युडीआयडी अर्थात स्मार्ट कार्ड (Smart card) असणार्‍या दिव्यांगांची नोंदणी (Registration process for persons with disabilities) प्रक्रिया सुरु झालेली असून आतापर्यंत जिल्ह्याभरातून 49 हजार 774 दिव्यांगांनी नोंदणी केली आहे.

कागदपत्रांमधील त्रुटी दूर करुन जिल्हयातील 21 हजार दिव्यांगांना स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी या संगणकीय प्रणालीतून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मोफत देण्यात येते. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी शासकीय सुट्टी वगळता दिव्यांग मंडळाकडून कागदपत्रांची तपासणी करुन कुपन दिले जाते. तर मुक्ताईनगर, चाळीसगाव,चोपडा आणि अमळनेर या चार तालुक्यात देखील दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून दर महिन्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या बुधवारी दिव्यांगांची तपासणी करण्यात येते.

युडीआयडी कार्ड नोंदणीसाठी भारत सरकारच्या वेबसाईटवर दिव्यांग व्यक्तीने ऑनलाईन फॉर्म भरुन त्या फॉर्मची प्रिंट काढून जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग मंडळाकडे जाऊन तपासणीचे कुपन घ्यावे. त्यानंतर कुपनवर दिलेल्या तारखेला आधारकार्ड, दोन फोटो, ऑनलाईन भरलेल्या फॉर्मस घेऊन त्याच दिवशी केस पेपर घेऊन तपासणीसाठी हजर व्हावे. दिव्यांग मंडळ समितीकडून तपासणी झाल्यानंतर एका महिन्यात युडीआयडी कार्डचे प्रमाणपत्र घरपोच येते.

दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या योजनापासून वंचित राहून नये. ज्या दिव्यांगांनी युडीआयडी काढलेले नाही. त्यांनी युडीआयडी कार्ड काढून घ्यावे. त्यानंतरच शासकीय विविध योजनाचा लाभ घेता येईल.

भरत चौधरी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जि.प.जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com