अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला मिळणार 47 लाख नुकसान भरपाई

अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला मिळणार 47 लाख नुकसान भरपाई

एरंडोल । प्रतिनिधी Erandol

मोटर सायकल (Motorcycle) व (Truck) ट्रकच्या सामोरा-समोर झालेल्या (Accident) अपघातात (Death) मृत्यू झालेले कैलास चुडामण पवार यांच्यास वारसांना न्यायालयाने रक्कम रुपये 47 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश सामने वाला इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनीला (IFFCO Tokyo Insurance Company) दिले आहेत.

एरंडोल येथील कैलास चुडामण पवार हे एरंडोल कडून पारोळाकडे दुचाकीने जात असताना समोरून पारोळ्या कडून एरंडोल कडे भरधाव वेगाने येत असंलेल्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दुचाकी चालक कैलास चुडामण पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांनी मे जळगाव न्यायालयात ॲड.हेमराज एम चौधरी यांचेमार्फत नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केलेला होता.

सदरील दावा दि.12 मार्च 2022 रोजी लोक न्यायालयात (Court) तडजोड करून रक्कम रुपये 47 लक्ष नुकसान भरपाई देण्याच्या आदेश घेऊन निकाली काढण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात पंच न्यायाधीश एस.जी.काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री जगमलानी तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप बोरसे यांनी तडजोडीसाठी विशेष सहकार्य केले.

इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनी तर्फे ॲड.अनिल चौगुले यांनी कामकाज पाहिले. तर अर्जदारा तर्फे ॲड.हेमराज एम.चौधरी यांनी कामकाज पाहिले. इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनीचे रवींद्र जाधव, ॲड.अशोक शिंदे, ॲड.दिनेश चौधरी यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com