दारूच्या नशेत नाल्यात पडून 46 वर्षीय इसमाचा मृत्यू

दारूच्या नशेत नाल्यात पडून 46 वर्षीय इसमाचा मृत्यू

फेकरी fekri, ता.भुसावळ । वार्ताहर

पिंपरीसेकम शिवारातील फौजी ढाब्याच्या बाजूला नालीत (drain) मंगळवारी सकाळी एक 46 वर्षीय व्यक्ती (old man) मयत अवस्थेत (dead state) आढळून आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रतन मधुकर गवई (वय 46)हे कपिल नगर वस्ती येथील रहिवासी असून त्यास दारू पिण्याचे व्यसन होते आणि दारूच्या नशेत सतत राहत असे. तसेच रतन गवई यांचे गावात पक्के घर नसल्यामुळे ते कुठेही झोपत व कोणाकडेही जेवण मागून खात असत. त्यांच्या व्यसनामुळे त्यांची पत्नी व मुली सोडून माहेरी शेलवड ता.बोदवड येथे राहत आहे. दि.2 मे 2023 रोजी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास पिंप्रीसेकम शिवारातील कपिलनगर वस्तीतील फौजी ढाब्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नालीत मयत अवस्थेत रतन गवई पडलेला आहे, असे कपिलनगर वस्तीतील मेंबर कुणाल नथ्थु सुरळकर यांनी फोन करून मयताचे नातेवाईक मनोज गायकवाड यांना कळविले

. या घटनेची खबर परिसरात कळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व निंभोरा बुद्रुक गावचे पोलीस पाटील उपस्थित होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर मयतास लोकांच्या मदतीने नाल्यातून बाहेर काढले. त्यावेळी ते मरण पावलेले होते. तसेच त्यांच्यावर मारहाणीच्या जखमा नव्हत्या. त्यानंतर रतन गवई यांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टम कामी घेऊन गेले. सदर प्रकरणाबाबत मयताच्या पत्नी व इतर नातेवाईकांना फोन द्वारे कळविण्यात आले.

मयताच्या मरणाबाबत नातेवाईकांशी पोलिसांनी विचारणा केली असता त्यांना कोणावर संशय नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तपास पोनिविलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. शाम मोरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com