नोकरीचे अमिष दाखवित लिपीकाला 44 लाखांचा गंडा

नोकरीचे अमिष दाखवित लिपीकाला 44 लाखांचा गंडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सरकारी नोकरी (Govt job) मिळवून देणार्‍या कार्यालयात कामाला असून तुमच्या मुलांना आरोग्य, रेल्वे आणि म्हाडा विभागात नोकरी लावून (getting a job) देतो. असे म्हणत महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील (Office of Women Child Development Project Officer) लिपीक प्रदीप चिंतामन ससाणे (वय-52, रा.गोकूळधाम नगर) यांना 44 लाखात गंडविल्याची (44 lakh case of misappropriation) घटना गुरुवारी उघडकीस आली. भूषण शरद पाटील (रा.खाजोळा, ता. पाचोरा) असे ठगबाजाचे नाव असून त्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील गोकूळधाम नगरातील रहिवासी प्रदिप ससाणे हे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात लिपीक पदावर नोकरीस आहे. ससाणे हे मूळचे पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथी ल आहे. त्यांच्या गावाजवळील खाजोळा येथील भूषण पाटील यांच्याशी त्यांची ओळख होती. डिसेंबर-2019 मध्ये भूषण हा ससाणे यांना भेटण्यासाठी जळगावात आला. तेव्हा त्याने मी सरकारी नोकरी मिळवून देणार्‍यांच्या कार्यालयात कामाला असून मी तुमच्या मुलांना सरकारी नोकरी मिळवून देतो असे त्याने ससाणे यांना सांगितले. तसेच तुमच्या मुलांना आरोग्य, रेल्वे आणि म्हाडा विभागात नोकरी लावून देईल, असे सांगितले होते. त्यामुळे प्रदीप ससाणे यांनी आपली मुले आणि भाचांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी टप्प्याटप्प्याने भूषण पाटील याच्या खात्यावर 44 लाख रूपये वेळोवेळी पाठविले.

गावात मिळून न आल्याने दिली तक्रार

प्रदीप ससाणे व त्यांच्या नातेवाईकांनी भूषण पाटील याचे खाजोळा गाव गाठत. गावात त्याचा शोध घेतला मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. अखेर सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचे कळताच गुरूवारी ससाणे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून भूषण पाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

...तरी देखील ऑर्डर नाही

वेळोवेळी पैसे घेतल्यानंतर तुम्हाला दि. 15 जुलै 2020 पर्यत नोकरीची ऑर्डर मिळून जाईल. असे आश्वासन भूषण पाटील याने प्रदीप ससाणे यांना दिले होते. मात्र दोन दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलटून देखील त्यांना ऑर्डर मिळाली नाही. त्यांनी भूषण याच्याशी संपर्क केला असतात्याचा फोन बंद होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com