40 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

वर्सी महोत्सवाचा आज समारोप; अखंड पाठ साहेब समाप्ती
40 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वर्सी महोत्सवनिमित्त (Varsi festival) सिंधी कॉलनीत (Sindhi Colony) शनिवारी जत्रेचा (fair) स्वरुप येवून भक्तीचा (devotion) जनसागर दिसून आला. तसेच रात्री अखंड पाठ साहेबची (Akhand Path Saheb) समाप्ती होवून भजन, किर्तऩ (Bhajan, Kirtan) तसेच संताच्या जीवनावरील नाटीका (play on the life of a saint) व कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच परिसराला जत्रेचे स्वरुप आले होेते.

पूज्य श्री अमर शहीद संत कवरराम साहब यांचा (65) वा,पूज्य सतगुरू श्री संत बाबा हरदासराम साहब यांचा (45) वा तर बाबा गेलाराम साहेब यांचा (14) वा वर्सी महोत्सव अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य संत कंवरनगर सिंधी पंचायंत यांच्यातर्फे आयोजित केला आहे. वर्सी महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी शनिवारी मोठ्या संख्येने देशभरातील भाविक आज जळगाव नगरीत दाखल झाले आहे. सकाळी 11 वाजता झेंडा पूजन कार्यक्रम झाला. दुपारी एक पासून भंंडाराचे आयोजन करण्यात आले यावेळी सुमारे 40 हजार जळगाव शहरासह बाहेर गावांवरून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

25 हजार भाविक जळगावनगरीत

वर्सी महोत्सवाला दरवर्षी देशभरातील नागरिक येत असतात. कोरोनामूळे दोन वर्षाचा खंड पडल्याने यंदा देशभरातील सिंधी बांधव मोठ्या संख्येने येण्याची शक्यता होती. त्यानुसार सुमारे 20 ते 25 हजार देशभरातील भाविक आले असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

वर्सी महोत्सवाला मंत्री महाजन यांची भेट

वर्सी महोत्सवाला भाजपचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आरोग्य सेवेचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून सिंधी बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी नगरसेवक आश्विन सोनवणे, धिरज सोनवणे, नगरसेवक अ‍ॅड, शुचिता हाडा आदी भाजपचे पदाधिकार्‍यांनी देखील महोत्सवाला भेट दिली.

भजन, प्रवचनाने भक्तीमय वातावरण

शनिवारी सायंकाळी सात वाजता अखंड पाठ साहेबची समाप्ती झाल्यानंतर सिंधी कॉलनीती सेवा मंडळ परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात बाबा हरदासराम म्युझिकल पार्टी (रतन जाधवानी, जळगाव), मखण म्युझिक पार्टी (लखनऊ), यार कंवर दिलदार कंवर नाटिका, दशेश्वर जागरण पार्टी (हरिद्वार) आदी कार्यक्रमातून संताचे दर्शऩ भाविंकांना घडविण्यात आले.

सिंधी कॉलनीला जत्रेचे स्वरुप

वर्सी महोत्सव निमित्त सिंधी कॉलनीला जत्रेचे स्वरुप आले असून मंदिर परिसरासह आकाशवाणीकडून येणारा रस्ता तसेच पांडे डेरीकडून येणारा रस्त्यावर सायंकाळी जत्रेचे स्वरुप आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साहित्य, खेळण्यांचे तसेच खाद्यपदार्थांचे दुकाने थाटलेले होते. तसेच दर्शनासाठी केेलेली खास सुविधा तसचे मंदिर परिसरात व रस्त्यांवर आकर्षक विद्यूत रोषणाई ही सर्वांचे लक्ष वेधत होती. तसेच रात्री अखंड पाठ साहेबची समाप्ती होवून भजन, किर्तऩ तसेच संताच्या जीवनावरील नाटीका व कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच परिसराला जत्रेचे स्वरुप आले होेते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com