
भुसावळ - bhusawal
शिक्षक (Teacher) शिक्षकेतर कर्मचा-यांच्या डीसीपीएस खात्यातील जवळजवळ ४० कोटी एवढी मोठी रक्कम वेतन विभाग प्राथ. (jalgaon) जळगाव कार्यालयाच्या कार्यतत्परने नवीन (Pension plan) पेन्शन योजनेच्या (एनपीएस) खात्यात जमा करण्यात आली आहे. २००५ पासून २०२१ पर्यंत सुमारे १६ वर्षांपासून अंशदायी पेन्शन (डीसीपीएस) योजनेचा कर्मचारी, शासन, व्याजाचा हिस्सा एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजनेमध्ये जमा करण्यात आल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
खाजगी प्राथमिक अनुदानित शाळा (schools) जळगावच्या ५९० डीसीपीएस धारक कर्मचार्यांची सदरची जवळपास रक्कम ४० कोटी ७४ लाख ९९ हजार २५५ इतकी मोठी रक्कम दि. ४ रोजी संबंधित कर्मचार्यांच्या एनपीएस खात्यात जमा करण्यात आली. यासाठी शालार्थ तज्ञ जयेश शिरसाठ, अतुल भोई, समीर तडवी, दीपक पाटील, तेजेंद्र महाजन, सागर झांबरे, भूषण अमृतकर, तुषार भोळे ,अजित चौधरी, गोविंदा लोखंडे ,अर्चना क्रहे, सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
डीसीपीएस स्लीप बनविताना खूप अडचणी येत होत्या परंतु इन्स्पेक्शन साठी नंदुरबार वेतन पथक प्राथमिकचे दीपक धनगर (सहाय्यक लेखा अधिकारी) हे वेतन पथक प्राथमिक जळगांव कार्यालयात तपासणीसाठी आले आणी त्यानी स्वतः बनवलेले डीसीपीएस सॉफ्टवेअर वेतन पथक प्राथमिक जळगांव कार्यालयास दिले. त्यानंतर शालार्थ तज्ञ मंडळी यांचे कॅम्प घेऊन समजून सांगितले त्यानंतर भगीरथ शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक शाम ठाकरे यांनी या कामासाठी शाळा व संगणक लॅब उपलब्ध करून दिली. सर्व टीमने रात्री २ ते ३ वाजे पर्यंत वेळ न बघता ८ दिवस सतत काम केले. सर्वांच्या सहकार्याने आणि मेहनतीने कमी वेळेत काम पूर्ण करू शकलो असल्याची प्रतिक्रिया वेतन अधीक्षक आर.बी.संदांनशिवे यांनी दिली.