जिल्ह्यात 4 लाख 16 हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप
जिल्ह्यात 4 लाख 16 हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके
USER

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

कोरोनाच्या (corona) दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार 462 (students) विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळास्तरावर पुस्तक मिळावे, यासाठी नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तक मंडळाकडे 4 लाख 16 हजार 462 पुस्तक संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे.

मे महिन्याअखेरपर्यंत तालुकास्तरावर होणार वाटप : पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे यंदा वेळेवर छपाई सुरु झालेली असून समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत तालुकास्तरावर पुस्तकांचे वाटप होईल. त्यानंतर शाळास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात येणार आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके वाटप होईल, असे नियोजन असल्याचे समग्र शिक्षा अभियानाच्या सूत्रांनी सांगितले.

यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळास्तरावर पुस्तक मिळावे, यासाठी नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तक मंडळाकडे 4 लाख 16 हजार 462 पुस्तक संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत तालुकास्तरावर पुस्तक प्राप्त होताच त्यांचे शाळास्तरावर वितरण करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा आणि शासकीय शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके देण्यात येतात. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे पुस्तकांची छपाई वेळेत झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तक मिळाली नव्हती.

यंदा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे पुस्तकांची मुदतीत छपाई करण्याचे नियोजन सुरु झालेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा संच वेळेत देण्याचे नियोजन आहे.

जि.प.च्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी जिल्हा यंत्रणेतर्फे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडे जळगाव जिल्ह्यासाठी 4 लाख 16 हजार 462 पाठ्यपुस्तके संचाची मागणी नोंदविण्यात आली असून त्यात मराठी माध्यमाच्या 3 लाख 66 हजार 583, तर उर्दू माध्यमाच्या 47 हजार 376, हिंदी माध्यमाच्या 1 हजार 562 आणि इंग्रजी माध्यमांचे 1 हजार 562 पुस्तके संच मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच पुस्तकांमध्ये होणारा पालकांचा खर्च वाचणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com