मध्य रेल्वेच्या ३६ उत्सव विशेष रेल्वे गाड्या धावणार

मध्य रेल्वेच्या ३६ उत्सव विशेष रेल्वे गाड्या धावणार

भुसावळ । प्रतिनिधी Bhusawal

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे अमरावती - पुणे आणि बडनेरा - नाशिक दरम्यान एकूण 36 उत्सव विशेष मेमू ट्रेन चालवणार आहे.

यात अमरावती-पुणे मेमू (4 अप आणि 4 डाउन एकूण 8 सेवा) - गाडी क्र.01209 विशेष मेमू अमरावती येथून दि. 5 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत दर रविवारी आणि बुधवारी 12.40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी 02.45 वाजता पोहोचेल. तर गाडी क्र. 01210 विशेष मेमू पुणे येथून दि. 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी 06.35 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 19.50 वाजता पोहोचेल. प्रवासादरम्यान या गाड्या अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे या स्थानकांवर थांबतील. या गाड्यांना आर कार मेमू रेक आहेत.

बडनेरा - नाशिक मेमू (14 अप आणि 14 डाऊन एकूण 28 सेवा) - गाडी क्र.01211 विशेष मेमू बडनेरा येथून दि. 6 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत दररोज 11.05 वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी 19.40 वाजता पोहोचेल. तर गाडी क्र. 01212 विशेष मेमू नाशिक येथून दि. 6 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत दररोज 21.15 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसर्‍या दिवशी 04.35 वाजता पोहोचेल. प्रवासादरम्यान बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक या स्थानकांवर थांबेल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com