नूतन मराठा महाविद्यालयाच्या मॅरेथॉन स्पर्धेत 350 विद्यार्थी धावले

मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन; प्राचार्यांनी स्पर्धेला दाखविली हिरवी झेंडी
नूतन मराठा महाविद्यालयाच्या मॅरेथॉन स्पर्धेत 350 विद्यार्थी धावले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रीय क्रिडादीन (National Sports Day) व नूतन मराठा महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तचे (golden jubilee year) औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धा (Marathon competition) घेण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख,उपप्राचार्य राजेंद्र देशमुख, उपप्राचार्या डॉ. माधुरी पाटील, उपप्राचार्य प्रा.ए.बी.वाघ, क्रिडाविभाग प्रमुख तथा स्पर्धेचे सचिव,आयोजक प्रा. सुभाष वानखेडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एन.जे. पाटील, राष्ट्रीय सेवायोजन अधिकारी डॉ.पी.बी.पाटील, राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट शिवराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

सहभागी स्पर्धकांना पर्ल होजिअरीचे संचालक शेखर देशमुख यांच्या हस्ते 100 टी शर्ट भेट म्हणून वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्याहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली.नूतन मराठा महाविद्यालयापासून, गणेश कॉलणी, दिनानाथवाडी, बहिणाबाई गार्डण महाराणा प्रताप चौक आकाशवाणी चौक स्वातंत्र्य् चौक नवीन बसस्थानक ते नूतन मराठा महाविद्यालय अशी पाच किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यात अंबर गणेश मेमरोड या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला तर महेंद्र प्रकाश महाजन, सौरभ अशोक पंडीत, पवन किशोर दहिभाते, श्रीराम विनोद शेवाळे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकावला, विजयी स्पर्धकांना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आयोजन समितीच्या सदस्यांच्या हस्ते रोख बक्षीसे, सन्मानचिन्ह,बुके देउन तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे निरिक्षक म्हणून प्रा.डॉ.सतीष पडलवार व भगतसिंग निकम यांनी काम पाहिले. चेकपोस्टवर तपासणीची जबाबदारी डॉ आफाक शेख, प्रा जितेंद्र पाटील व प्रा मोरे यांनी पार पाडली. पायलट म्हणून, विष्णू ठाकरे,प्रा घनश्याम पाटील कल्पेश जाधव,प्रणव शर्मा, वेदांत आर्डे, मुकेश हिवराळे, व महेंद्र सोनगिरे यांनी भुमिका निभवली.

फिनिशिंग पॉईंटला प्रा.सुभाष वानखेडे, डॉ के.बी.पाटील, प्रा.गायकवाड, प्रा.आर.बी.देशमुख, वसंत पाटील आदिंनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सुभाष वानखेडे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com