Video गिरणा धरणातून ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Video गिरणा धरणातून ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

चाळीसगाव | प्रतिनिधी chalisgaon

गेल्या काही दिवसांपूर्वी गिरण १०० टक्के पाणी क्षमतेने भरले. आता गिरणधरण (girna dam) परिक्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पासून सुरु आहे. त्यामुळे आज दि. १९ रोजी सकाळी ८.०० वाजता गिरणा धरणाचे वक्रद्वार क्रमांक १, २ व ५, ६ हे प्रत्येकी ५ फुटने उघडण्यात आलेले आहे. सध्यस्थितीत धरणाचे ४ वक्रद्वार ५ फुटने व २ वक्रद्वार ४ फुटने उघडे असून त्याद्वारे गिरणा नदीपात्रात एकूण ३5 हजार ६६४ क्युसेस पाण्याच्या विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

Video गिरणा धरणातून ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
Video धुळे देवपूर परिसर झाला जलमय ; जनजिवन विस्कळीत

महाकाय गिरणा धरणाचे चार दरवाजे सहा उघडण्यात आलेले होते. या धरणातुन जवळपास ३५ हजार क्युसेस पाणी गिरणा नदीपात्रात वाहन असतांना रात्री गिरणा धरण क्षेत्रावरील भागात पडलेल्या पावसाने गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. धरणामध्ये येणार्‍या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहाण्याच्या सूचना पाठबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

चाळीसगाव परिसरात रात्रीपासून पाऊस

चाळीसगाव परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतपिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर आधीच पूर्ण क्षमतेने भरलेले तालुक्यातील लघु प्रकल्प, नदी-नाले ओसडून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com