32 हजार 300 मतदार, 21 जागा, पाच पॅनल रिंगणात : ही आहे ग.स. निवडणूकीची रणधुमाळी

पहिल्याच दिवशी 10 उमेदवारी अर्ज दाखल
 32 हजार 300 मतदार, 21 जागा, पाच पॅनल रिंगणात : ही आहे ग.स. निवडणूकीची रणधुमाळी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (Co-operative Credit Bureau of District Government Servants) अर्थात ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (five-year election) 21 संचालकांसाठी आजपासून अर्ज विक्री व दाखल (Sale and filing of application) करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 150 अर्जांची विक्री झाली असून 10 उमेदवारांनी (candidates) अर्ज दाखल केले आहे.

ग.स.सोसायटीच्या रणधुमाळीला (Ranadhumali) दि. 25 मार्चपासून प्रारंभ झाला आहे. 5 स्थानिक मतदार संघ, 11 बाहेरील मतदार संघ, 1अनु.जाती/जमाती मतदार संघ, 2 महिला राखीव मतदार संघ,1 इतर मागासवर्ग मतदार संघ, 1 भटक्या जाती/जमाती व वि.मा.प्र. अशा 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया (Election process) राबविण्यात आली आहे.

दि. 25 ते 31 मार्च दरम्यान सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान ग.स.सोसायटीच्या मुख्य शाखेत नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल (Sale and filing of nomination papers) करण्यात येणार आहे. शुक्रवारी पहिल्या पहिल्याच दिवशी 150 अर्जांची विक्री झाली असून 10 उमेदवारांनी (candidates) अर्जदेखील दाखल केले आहे.

या उमेदवारांनी दाखल केले अर्ज

बाहेरील मतदार संघातून

नथ्थू सीताराम पाटील, सुनील अमृत पाटील, संदीप सुकदेव पवार, शैलेश रमेश राणे, गणेश भास्करराव पाटील, प्रवीण आत्माराम पाटील, महेश विठ्ठल पाटील

तर स्थानिक मतदार संघातून

उदय मधुकर पाटील, राम रविंद्रनाथ पवार

तर अनु.जाती/जमाती मतदार संघातून

अनिल वसंत सुरडकर आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यात सुनील अमृत पाटील यांनी बाहेरील मतदार संघातून दोन अर्ज दाखल केले आहे.

आज पहिल्याच दिवशी 10 अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) तथा उपजिल्हा निबंधक संतोष बिडवई (Santosh Bidwai), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी के.डी.पाटील, विशेष जिल्हा आडिटर आर.एल.शहा, ग.स.सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी विजय गवई हे काम पाहात आहेत.

32 हजार 300 मतदार ठरविणार भवितव्य

ग.स. सोसायटीचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2021 रोजी संपुष्टात झालेला आहे. मात्र, कोरोना (Corona) महामारीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता कोरोनाची लाट ओसरल्याने ग.स.सोसायटीच्या निवडणूक (election) प्रक्रियेला सुरू झाली आहे. 21 जागांसाठी 5 पॅनल रिंगणात उतरले असून या निवडणुकीसाठी यंदा 32 हजार 300 मतदार आहेत. ज्यातील 17 हजार मतदार हे शिक्षक आहेत. या निवडणुकीच्या मैदानात सहकार पॅनल, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती शिक्षक सेना आणि स्वराज्य पॅनल अशी पंचरंगी लढत रंगणार आहे.

पाच पॅनल मैदानात

सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील,लोकसहकार गटाचे अध्यक्ष शामकांत भदाणे,लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि स्वराज्य पॅनलप्रमुख आर.के.पाटील असे पाच पॅनलप्रमुख आपआपल्या गटाची धुरा सांभाळीत आहेत.

28 एप्रिलला मतदान

ग. स. निवडणुकीसाठी रणधुमाळीला आजपासून प्रारंभ झाला असून दि. 25 ते 31 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज (Candidature application) दाखल तर दि. 1 एप्रिल रोजी छाननी, दि.4 ते 18 एप्रिलदम्यान माघार आणि दि. 28 एप्रिल रोजी मतदान होऊन दि. 30 एप्रिल रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित (Results declared)करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.